Download App

धनंजय मुंडेंचा गेम ओव्हर? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा देण्याचा आदेश!

हत्येचे फोटो सार्वजनिक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

  • Written By: Last Updated:

Minister Dhananjay Munde Resigns : मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट राजीनामा द्यायला सांगितल्याची माहिती समोर येत आहे. (Munde) संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामुळे मुंडे अडचणीत आले असून त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर येताच संताप; आज बीड जिल्हा बंद!

मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणात अटक झालेल्या वाल्मिक कराड यांचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी निकटचे संबंध असल्याने त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे.

क्रौर्याची परिसीमा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपपत्रात वाल्मिक कराड यांना मुख्य सूत्रधार म्हणून नमूद करण्यात आले आहे. कराड यांनी अवदा कंपनीच्या भू-संपादन अधिकाऱ्याकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. देशमुख यांनी या खंडणीला विरोध केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. आरोपींच्या फोनमधील व्हिडिओ आणि फोटोमधून या हत्येची क्रूरता उघड झाली आहे.

राजीनाम्याची मागणी

हत्येचे फोटो सार्वजनिक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत फडणवीस यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असल्याचे समजते.

follow us