संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर येताच संताप; आज बीड जिल्हा बंद!

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजागचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्र सुन्न झाला. या प्रकरणी सीआयडीने दोन दिवसांपूर्वी दोषारोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात वाल्मिक कराडचा आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख केला होता. यानंतर काल संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे फोटो समोर आले. अतिशय निर्दयीपणे त्यांची हत्या करण्यात आले. घटनेचे फोटो पाहून राज्यातच संतापाची लाट उसळली आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याचे या फोटोंतून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. आरोपींनी अतिशय निर्दयीपणे देशमुख यांची हत्या केली. शब्दही नाहीत अशा पद्धतीने हालहाल करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात सीआयडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर काल या हत्येचे काही फोटो व्हायरल झाले. या फोटोत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी अत्यंत निर्घृणपणे ही हत्या केली असे स्पष्ट दिसत आहे.
संतोष देशमुखांच्या हत्येचा अखेर उलगडा! काळजाचा थरकाप उडणारा तो क्रूर व्हिडिओ सीआयडीच्या हाती
इतकेच नाही तर देशमुख यांना मारहाण करतानाचे आणि अन्य घृणास्पद कृत्य करतानाचे व्हिडिओ शूट करण्यात आले. तपास यंत्रणांनी या व्हिडिओचे स्क्रिन शॉट काढून त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली आणि हे फोटो चार्जशीट सोबत जोडले आहेत. हेच फोटो व्हायरल झाल्यानंतर पुन्हा संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
संबंधित फोटो मन विचलित करणारे आहेत. परंतु, प्रकरण आता न्यायालयात आहे त्यामुळे सदर फोटो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहेत. त्यामुळे नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये असे आवाहन बीड जिल्हा पोलीस प्रमुख नवनीत कॉवत यांनी केले आहे.
हत्येचा क्रूर व्हिडिओही समोर
सीआयडीने हा जो व्हिडिओ पुरावा म्हणून जोडला आहे. त्यातील हे काही स्क्रीनशॉट काढले आहेत. त्यानंतर ज्या व्यक्ती या व्हिडिओमध्ये दिसत आहेत त्यांचे चेहरे मॅच करून बघितले असता ते मॅच होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या फोटोंमध्ये देशमुख यांना अमानुषपणे मारहाण केली जात आहे. त्यांच्या छातीवर पाय ठेवून फोटो काढले जात आहेत. त्यामुळे सीआयडीने जोडलेल्या या परिशिष्टातील काही फोटो किंवा व्हिडिओ अगदी त्यांच्या जवळ जाऊन काढण्यात आले आहेत.
बीड महामार्गावर अंबडजवळ अपघात; सळई घेऊन जाणारा ट्रक उलटला; चालक जागीच ठार