Download App

संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवा अन् आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडेंनी मांडली भूमिका

Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आरोपींना

  • Written By: Last Updated:

Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आरोपींना कडक शासन व्हावे, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी पहिल्या दिवशीपासून ठाम भूमिका होती आणि आजही तीच कायम आहे.

या प्रकरणी आरोपींना कोणाच्याही कितीही जवळचा असला तरी तातडीने शासन व्हावे यासाठी आणि न्यायालयीन दिरंगाई होऊ नये म्हणून फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालावे यासाठी बारा डिसेंबरला सर्वात आधी मुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी मी केलेली आहे, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केले आहे.

तर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा ही सर्वांचीच भूमिका आहे. मात्र या घटनेच्या आडून जे राजकारण केले जात आहे, ते दुर्दैवी आहे, तसे हे करू नये असे कळकळीचे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येची घडलेली घटना निर्घृण आणि तितकीच चीड आणणारी होती. यासारख्या घटना जिल्ह्यातच काय तर महाराष्ट्रात कुठेही होऊ नयेत यासाठी अशा गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढणे आवश्यक आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी योग्य ती पाऊले उचलली असल्याचे ते म्हणाले.

‘करुणाताई तुम्ही असं करणार नाही…’,प्राजक्ता माळीचं भावनिक आवाहन

तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे आणि इतर तीन आरोपींचा शोध घेत आहे. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

महिला आयोगाकडे तक्रार, फक्त टीआरपीसाठी माझं नाव, प्राजक्ता माळीचं सुरेश धसांना प्रत्यूत्तर

follow us