Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या काही दिवसांत नव्या-नव्या अपडेट येत आहेत. या प्रकरणात आत्तापर्यंत दोन सुनावण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, आता नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. (Santosh Deshmukh) या प्रकरणातील प्रमुख तीन आरोपींनी कराड नामक व्यक्तीचं नाव घेतलं आहे. या व्यक्तीमुळेच संतोष देशमुखांची आम्ही हत्या केली असं त्यांनी म्हटलं आहे. पण हा कराड नेमका कोण आहे? त्याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? जाणून घेऊयात.
नेमकं काय आहे प्रकरण?
संतोष देशमुखांचं अपहरण करुन त्यांची हत्या करणारा प्रमुख आरोपी सुदर्शन घुले यानं पोलिसांना जबाब देताना सांगितलं की, सुग्रीव कराड यानं संतोष देशमुख यांना सुदर्शन घुलेला मारहाण करण्यास सांगितलं. त्यामुळं माजी सरपंच असलेल्या देशमुखांनी आवादा कंपनीच्या वॉचमनला धमकावणाऱ्या सुदर्शन घुलेच्या कानशिलात लगावली.
संतोष देशमुख हत्या; त्यामागे धनंजय मुंडेच, अंजली दमानिया यांनी नवीन बॉम्ब फोडला
पण कानशिलात लगावल्यानं सुदर्शन घुले आणि त्याचा आका वाल्मिक कराड यांची मोठी बदनामी झाली होती. या बदनामीचा बदला घेण्यासाठीच कानशिलात लगावणाऱ्या संतोष देशमुखांचं आम्ही अपहरण करुन हत्या केली, असा जबाब जयराम चाटे आणि महेश केदार या दोघा आरोपींनी पोलिसांसमोर दिला आहे.
प्लॅन बनवला
या दोघांना ही माहिती कृष्णा आंधळे या फरार आरोपीनं दिली होती. म्हणजेच कृष्णा आंधळेच्या माहितीवरुन सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी संतोष देशमुख यांचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला आणि हा प्लॅन त्यांनी प्रत्यक्षात आणला. दरम्यान, आता सुग्रीव कराडचं या प्रकरणात थेट नाव आल्यानं तो यावर काय स्पष्टीकरण देतोय, हे पाहावं लागणार आहे.