गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Beed) हाच प्रश्न मुंडे यांचे कौटुंबिक नाते असलेल्या आणि स्व. प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांना विचारला असता त्यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड टीका केली आहे. गोपीनाथ यांचे खरे वासरदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडमधील जनता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आले असून माझी जमीन देखील त्यांनी लाटली आहे असा थेट आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे.
आज गोपीनाथ मुंडे असते तर बीड मधील कोणतेच प्रकरण झाले नसते. वाल्मिक कराडला वर येऊ दिले नसते तसेच या दोघांना देखील वर आणले नसते, असे सारंगी महाजन म्हणाल्या आहेत. या दोघांच्या राजकारणामुळे बीडमधील जनात प्रचंड नाराज असून यांना लोक शिव्या घालतात, असे देखील त्या म्हणाल्या. गोपीनाथ मुंडे हे मोठे नेते होते. त्यांचा वारसदार ही बीडची जनता आहे. बीडची जनता हे पहिले वारसदार आहेत. दुसरे वारसदार हे गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. पंकजा, धनंजयची त्यांचे नाव घेण्याची लायकी नाही. गोपीनाथरावांच्या राजकारणासारखं राजकारण यांचं नाही असंही त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडेंनी दिलेला त्रास मला रडत सांगायचा, आज आधार वाटतो का? करुणा शर्मांचा आरोप
हे गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर येऊन बसलेत. गोपीनाथ मुंडे यांनी मुलीला घडवलं. पण, ही घडली नाही तर बिघडली. ती जे दाखवते ते रिल्समध्ये दाखवते. ती फक्त शोबाजी करते. खरं राजकारण नाही, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. तर धनंजय मुंडे यांनी आपल्या बायकोला सांभाळावं. हा नालायकासारखं वागतोय, असे म्हणत त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. गोपीनाथ मुंडे कधीही कुणाची जमीन बळकावली नाही. हे बहिण भाऊ लोकांना लुटत असतात. खंडणी उकळत असतात. म्हणूनच हे बहिण भाऊ एकत्र आले आहेत.
जिचा संसार नीट नाही ती काय लोकांचे संसार नीट लावेल? आम्हाला सुध्दा यांच्याच पक्षातील लोक सांगतात.
देवेंद्रजींकडे मी गेले होते. ते बोलले मी काय यात करू शकतो. ते फक्त हसले, असे देखील सारंगी महाजन म्हणाल्या. सारंगी महाजन पुढे म्हणाल्या की, 2006 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पडद्यामागून आम्हाला मदत केली. मला पोलिसांनी अटक केली नाही. गोपीनाथराव समोरून आले नाही. मात्र त्यांनी आम्हाला जी मदत केली, हे आम्हाला माहिती आहे. जावई म्हणून त्यांनी प्रवीणला प्रचंड मदत केली. त्यांनी आम्हाला ऑफ द रेकॉर्ड मदत केली. मला गोपीनाथरावांबद्दल अभिमान आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
