पंकजा मुंडेंनी दिलेला त्रास मला रडत सांगायचा, आज आधार वाटतो का? करुणा शर्मांचा आरोप…
पंकजा मुंडे यांनी दिलेला त्रास मला रात्री दोन-दोन वाजेपर्यंत मांडीवर रडून सांगत होता, आज तिचा आधार वाटतो का? असा थेट सवाल धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी केलायं.

Pankaja Munde : पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांनी दिलेला त्रास मला रात्री दोन-दोन वाजेपर्यंत मांडीवर रडून सांगत होता, आज तिचा आधार वाटतो का? असा थेट सवाल धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी केला आहे. दरम्यान, दसरा मेळाव्यानिमित्त आमदार धनंजय मुंडे यांनी भाऊ बहिणीच्या संबंधावर भाष्य केलं. त्यावरुन शर्मा यांनी प्रतिक्रिया दिलीयं.
250 दिवस माझी खूप वाईट मानसिकता होती. माझी बहिण माझ्या जवळ येऊन तासन् तास बसत होती. मीडिया ट्रायल सुरु होतं, तेव्हा बहिणीने मला आधार दिला, पक्षाच्या महायुतीच्या नेत्यांनी आधार दिला असल्याचं विधान धनंजय मुंडे यांनी केलं होतं.
विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर दसरा मेळावा अन् संघाची शताब्दी, मोहन भागवतांनी केलं गांधींचं स्मरण
या मुद्द्यावर पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, 2009 पासून ते 2022 पर्यंत हे भाऊ-बहिण एकमेकांसाठी कट कारस्थान रचत होते. आज ज्या बहिणीला आधार मानतात ती किती त्रास देत होती. तुम्ही माझ्या मांडीवर रात्री दोन वाजेपर्यंत रडत होता. आज तिचाच आधार वाटतो का? पंकजा मुंडे शेतकऱ्यांना कसा न्याय देतील? असा सवालही करुणा शर्मा यांनी केलायं.
तसेच कारखान बंद केला, गोरगरीब लोकांचे पैसे ने देता दोन्ही कारखाने बंद केले आहेत. आज ऊसतोड कामगारांचे पैसे 30-30, 40-40 कोटी दोन्ही कारखान्यांमध्ये अडकलेले आहेत, पण तुम्ही देत नसल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केलायं.
US Shutdown : अमेरिकेत शटडाऊनला सुरूवात; कामकाज बंद, शटडाऊन म्हणजे काय? परिणाम काय?
दरम्यान, काल झालेल्या दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकवण्यात आले. हे संकेत आहे की काय पण असू द्या, आमच्या पोटाचं पाणी वाल्मिक कराडशिवाय हालत नाही, ना हलणार, त्यासाठी परळीत त्यांना कोणी नवीन व्यक्ती नकोयं, जे गुंडाराज संपवतील. जरी माझ्यासारखा कोणी नवीन आला तर तो गुंडाराज संपवेल, राजकारण संपवेल, यासाठी दोघे बहिणभाऊ एकत्र आले असल्याचं करुणा यांनी म्हटलंय.