तो दिवस आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा होता; गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावूक

तो दिवस आमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारा होता; गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावूक

Pankaja Munde on Gopinath Munde : तीन जून 2014 हा दिवस आमच्या कुटुंबासाठी (Pankaja Munde) अत्यंत दुखद आणि उद्ध्वस्त करणारा होता, अशी भावना मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. तसंच, मुलगी म्हणून त्यांचे कर्तव्य जाणीवपूर्वक पार पाडण्यासाठी आज साधारण कार्यक्रम आयोजित केला असल्याचेही त्यांनी सांगितलं.

दिवंगत उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज परळीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पण पावसामुळे हा कार्यक्रम लवकर संपवावा लागला. असंही त्या म्हणाल्या. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. या निमित्ताने गोपीनाथगडावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

सर्वसामान्यांचे वाली गोपीनाथ मुंडे आजही जिवंत; वडिलांच्या आठवणीत पंकजा मुंडे भावूक, गोपीनाथ गडावर

या कार्यक्रमात ११ वर्षांनंतर पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनंजय मुंडे उपस्थित होते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता आमचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे त्या पक्षातील सर्व नेत्यांना आम्ही निमंत्रण दिले होतं. तसंच, धनंजय मुंडे यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं.

रामटेक बंगल्याबाबतही पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं. ‘हा बंगला मला राहण्यासाठी मिळाला आहे. खरं तर, २०१४ मध्येच मी तो मागितला होता, पण तो वरिष्ठ मंत्र्यांचा बंगला असल्याने मला मिळाला नव्हता. आता तो मला मिळाल्याने मला मोठं पारितोषिक मिळाल्याचा आनंद वाटतो, मुंडे साहेबांच्या पश्चात मला हा बंगला मिळणं, ही गोष्ट ऐतिहासिक आहे. देशात असं एखादंच उदाहरण असेल. हा बंगला माझ्यासाठी केवळ वास्तू नाही, तर एका विचारांचा आणि जबाबदारीचा प्रतीक आहे, असेही त्यांनी नमूद केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube