Download App

मोठी बातमी : वाल्मिक कराडवर मोका अंतर्गत कारवाई; हत्येचा कट रचल्याचा SIT चा आरोप

Sarapanch Santosh Deshmukh Case Walmik Karad : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्येनंतर मस्साजोगचे ग्रामस्थ संतप्त झालेत. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. तर धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहे. त्यासाठी काल आंदोलन देखील केलंय. दुसरीकडे कराडची (Walmik Karad) आज सीआयडी कोठडी संपलीय. याप्रकरणी आज केज न्यायालात सुनावणी पार पडलीय. यावेळी न्यायालयाने कराडला खंडणी प्रकरणात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर, SIT ने संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करत कराडवर  मकोका लावण्यात आला आहे. केज न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळावा, या मागणीसाठी बीड जिल्ह्यात सत्ताधारी आणि विरोधकांच्या नेत्यांनी निदर्शने केलीत. बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या हत्येचा निषेध आणि मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 28 जानेवारीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बीड सरपंच हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या आईने पोलिस ठाण्यासमोर निदर्शने केली. तसेच कराड यांच्या सुटकेची मागणी केली.

Suresh Dhas : फडणवीसांनी मला बोलायला सांगितले नाही अन् गप्प राहा, असेही म्हणाले नाहीत

माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला गोवण्यात आलंय. त्याला सोडण्यात यावं. माझं आयुष्य संपलं तरी मी येथून उठणार नाही, असं देखील वाल्मिक कराडच्या आईने सांगितलंय. वाल्मिक कराडच्या आईसह 50 जण निदर्शनात सहभागी झाले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. खुनापूर्वी सरपंच देशमुख यांचाही छळ करण्यात आला होता. अवादा कंपनीविरुद्ध खंडणीचा प्रयत्न थांबवण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे खंडणीचे मोठे प्रकरण आहे. सरपंचाच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला वेग आला, त्यानंतर सात आरोपींना अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांनी पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. तेव्हापासून ते कोठडीत होते.

VIDEO : संतोष देशमुखांची हत्या, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? धसांनी केला मोठा गौप्यस्फोट

याप्रकरणी आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठही आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र सीआयडीचे विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाचा तपास करत आहे.

वाल्मिक कराडसह (Walmik Karad) विष्णू चाटेच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतला आहे.  आज त्याच्या कोठीडीची मुदत संपणार आहे. याआधीच त्याच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतले आहेत. आवाजाचा नमुना महत्वाचा पुरावा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

follow us