Download App

‘ते सुटले तर माझाही खून होईल…त्यापेक्षा मीच स्वत:ला संपवतो’; संतोष देशमुखांच्या भावाने दिला आंदोलनाचा इशारा

Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh Protest Warning : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. खंडणी ते खून हे प्रकरण सीआयडीने 31 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत स्पष्ट केलं होतं. त्यावरच आरोपीला पंधरा दिवसांचा पीसीआर दिला होता. जर या आरोपीला मोक्का आणि 302 खाली खूनाच्या आरोपाखाली नाही घेतलं, तर उद्या 10 वाजेपासून माझं आणि माझ्या कुटुंबाचं वैयक्तिक आंदोलन असेल. या आंदोलनात मी गावात मोबाईल टॉवर (Santosh Deshmukh Murder) आहे. त्यावर जावून स्वत:ला संपून घेतो, अशी भूमिका आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलीय.

सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात न्याय मिळत नसल्याची भूमिका देशमुख कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या भावाने आंदोलनाचा इशारा दिलाय. धनंजय देशमुख म्हणाले की, माझ्या या भूमिकेमागे मोठं कारण आहे. जर हे आरोपी सोडले, तर ते उद्या माझा खून करतील. हे मला पण असेच निर्घृण मारतील. मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल. याशिवाय माझ्या भावाला पण बरं वाटेल, की हा अशा पद्धतीने मारला गेला नाही. त्यामुळे मी स्वत:चं संपतो, असं वक्तव्य धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केलंय.

मित्राच्या शपथविधी समारंभाला जाणार नाही PM मोदी, एस जयशंकर करणार भारताचं प्रतिनिधित्व

उद्या 10 वाजता कुटुंबाचं आंदोलन आहे. मी टॉवरवर चढून स्वत:ला संपवून घेणार आहे. मला भीती आहे. हा गुन्हा खंडणीतील आहे. 6 तारखेला हे खंडणी मागायलाच आले होते. 28 मे पासून हा सगळा प्रकार खंडणीतुनच घडलेला आहे. दुसरं कोणतंही कारण नाही. जर मला न्याय भेटत नसेल. सगळी माहिती भेटत नसेल. या सगळ्यापासून दूर ठेवलं जात असेल. तर मी घेतलेला निर्णय योग्य आहे. मी आणि माझं कुटुंब आम्ही उद्या हा निर्णय घेतोय. ही गोष्ट आम्ही गांभीर्यानं करतोय. माझ्या भावासोबत जी गोष्ट झाली, ती उद्या आमच्यासोबत होवू शकते, असं देखील धनंजय देशमुख म्हणाले आहेत.

बांग्लादेशी घुसखोर…राज्यात वोट जिहाद सुरू झालंय; CM फडणवीसांचा गंभीर आरोप

उद्या सकाळी दहा वाजता माझ्या आंदोलनाला सुरूवात करणार आहे. टॉवरवर जाणार आहे अन् मला संपवून घेणार. मला या सगळ्यांपासून भीती आहे. खंडणी ते खून प्रकरणातील आरोपींना जाणीवपू्र्वक बाहेर काढलं जातं. त्याबद्दल आम्हाला, गावकऱ्यांना काही सांगितलं जात नाही. आठवा आरोपी अचानक येतो, त्याला खून प्रकरणात घेतलं जातं. मी मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवून चूक केली का, असा सवाल धनंजय देशमुख यांनी माध्यमांसोबत बोलताना केलाय.

यंत्रणा आम्हाला सगळी माहिती देत नसेल, कोणाला तरी वाचविण्याचा प्रयत्न करत असेल. तर आमच्या या न्याय मागण्याला काहीच अर्थ नाही.म्हणून मी गांभीर्यपूर्वक सांगतो की, उद्या माझं आंदोलन असेल. असं देखील धनंजय देशमुख म्हणाले आहेत.

 

follow us