Sharad Pawar : सध्या सुरू असलेल्या लोकसभा निडवणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून स्टार प्रचारकांच्या यांदीत आणि सभेत सर्वात वरच्या स्थानी कोण असेल तर ते शरद पवार आहेत. राष्ट्रवादीने अधिकृत जाहीर केल्या प्रमाणे शरद पवार सुमारे 54 जाहीर सभा घेणार आहेत. (Satara Loksabha) त्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रात (Udayanraje Bhosle) शरद पवारांच्या सभांचा झंझावात सुरू आहे. आजची साताऱ्यातील पाटणमधील सभा पवारांनी कॉलर उडवत गाजवली.
UdayanRaje Bhosle : ‘शरद पवार माझ्या बारशाला आले होते, पण मी आता बच्चा राहिलेलो नाही’
सातारा आपलाच
सातारा लोकसभेसाठी महायुतीकडून विद्यमान राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले उमेदवार आहेत. तर, महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे लोकसभेच्या मैदानात आहेत. शिंदे यांच्या प्रचार सभेसाठी शरद पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना पवारांनी आपला अनोखा अंदाज कायम ठेवला. पवार बोलत असाना कार्यकर्त्यानेघोषणा दिली ‘सातारा आपलाच’ तेव्हा लगेच पवारांनी त्याच्या म्हणण्याला आपली कॉलर उडवत अनुमोदन दिलं. यावेळी उपस्थितांनी मोठा जल्लोष केला.
कॉल उडवण्याची स्टाईल
कॉलर उडवणं ही उदयनराजे भोसले यांची स्टाईल आहे. ते राष्ट्रवादीत असताना एका पत्रकार परिषदेत शरद पवार आणि उदयनराजे सोबत असाताना पवारांनी उदयनराजेंच्या समोरच आपली कॉलर उडवत एका प्रश्नाला उत्तर दिलं होतं. त्यानंतर उदयनराजे भाजपमध्ये गेले. परंतु, उदयनराजे यांचा विषय अनेकदा आला, त्यावर पवारांनी काहीवेळा कॉलर उडवून उत्तर दिली आहेत.
उदयनराजेंबद्दल प्रश्न विचारताच पवारांनी थेट कॉलरच उडवली; पत्रकार परिषदेत काय घडलं?
पावसातील सभा गाजली
2019 राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले उमेदवार होत. त्यांचा त्या निवडणुकीत विजयही झाला. परंतु, काही काळातचं त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केला. त्यानंतर तेथे निवडणूक झाली. राष्ट्रवादीकडून पवारांचे मित्र श्रीनीवास पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यावेळी पवारांची सभा झाली. त्या सभेला जोरदार पाऊस आला. त्या पावसात पवारांनी सभा घेतली जी पूर्ण महाराष्ट्रभर मोठी गाजली. आणि निवडणुकीच वार फिरलं. उदयनराजे यांचा 90 हजार मतांनी पराभव करत श्रीनीवास पाटलांनी बाजी मारली.