शरद पवारांनी कॉलर उडवत केली नक्कल, उदयनराजे म्हणाले, ‘ते पवार साहेब…’

शरद पवारांनी कॉलर उडवत केली नक्कल, उदयनराजे म्हणाले, ‘ते पवार साहेब…’

Udayanaraje on Sharad Pawar :महायुतीकडू (Mahayuti) लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Elections) मिळविण्यासाठी उदयनराजेंना ( Udayanaraje) मोठा संघर्ष करावा लागत आहे. भाजपने (BJP) त्यांना अद्याप उमेदवारी दिली नाही. त्यामुळं ते शरद पवारांच्या (Sharad Pawar) संपर्कात होते, असा दावा केला जातोय. याविषयी काल पवारांना विचारले असता त्यांनी कॉलर उडवून एक प्रकारे उदयनराजेंना आव्हानं दिलं. त्यावर आता उदयनराजेंन भाष्य केलं.

Nayak 2 : अनिल कपूर दिग्दर्शक एस शंकरसोबत काम करणार; अभिनेता पुन्हा बनणार CM? 

बावधन यात्रेनिमित्त आयोजित बगाडा मिरवणुकीच्या दर्शनासाठी उदयनराजे गेले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तुम्ही बगाडाकडे काय मागणं घातलं, असा प्रश्न विचारला असता उदयनराजे म्हणाले की, आपण सर्वांनी बंधुभावाने जगले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजेत. तरच या देशाची परंपरा कायम राहील. प्रत्येकाची पाच बोटे वेगवगेळी असतील तरी प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे. राजकारणाचा भाग नंतरची. मी कधीही राजकारण केलं नाही आणि कधीच करणारही नाही, असं उदयनराजे म्हणाले.

परभणीतून महादेव जानकर लोकसभा लढणार, अजितदादा गटाच्या कोट्यातून रासपला जागा 

काल शरद पवारांनी तुमची कॉलर उडवत स्टाइल केली, याबाबत विचारले असता उदयनराजे म्हणाले की, पवारांनी माझी स्टाईल मारली, त्याला मी काय करणार? ते शरद पवार साहेब आहेत, असं उदयनराजे म्हणाले.

शिवेंद्रराजेंना उदयनराजेंनी वाढदिवसाचा शुभेच्छा दिल्या, त्यावरही त्यांनी भाष्य केलं. होय मी त्यांच्यासाठी पोस्ट केली होती, ते माझे भाऊ आहेत आणि भविष्यातही पोस्ट करेन, असं उदयनराजे म्हणाले.

भाजप फसवाफसवी करते का?
भारतीय जनता पक्ष तुमच्यासोबत फसवणुकीचे राजकारण करत आहे का? राजघराण्याला लोकसभेच्या उमेदवारांपासून दूर ठेवले जात आहे का? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, हा बगाडाचा विषय आहे, इथं राजकारण आणून का. फसवाफसवी हा पिक्चर होता ना, तो बघा म्हणजे सगळं कळेल, असं उदयनराजे म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube