Nayak 2 : अनिल कपूर दिग्दर्शक एस शंकरसोबत काम करणार; अभिनेता पुन्हा बनणार CM?

Nayak 2 : अनिल कपूर दिग्दर्शक एस शंकरसोबत काम करणार; अभिनेता पुन्हा बनणार CM?

Anil Kapoor ‘Nayak 2 Hint: मेगास्टार अनिल कपूर (Anil Kapoor) यशस्वी वाटचाल करत असताना त्याचे शेवटचे दोन थिएटर रिलीझ ‘ॲनिमल’ (Animal) आणि ‘फाइटर’ (Fighter) बॉक्स ऑफिसवर (box office) दमदार कमाई केल्यानंतर OTT प्लॅटफॉर्मवर ट्रेंड करत आहेत. आता अभिनेता त्यांच्या समीक्षकांनी प्रशंसित चित्रपट ‘नायक’ च्या सिक्वेलसाठी पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते एस शंकर यांच्यासोबत काम करणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे.

अनिल कपूर या दिग्दर्शकासोबत मुंबईत सोबत दिसले आणि तेव्हापासून ‘नायक 2’ बद्दलच्या चर्चाना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो व्हायरल होत आहे. आता हे दोघे नायक 2 साठी पुन्हा सोबत काम करणार का? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. अनिल कपूर-स्टारर हा शंकरच्या 1999 च्या तामिळ- भाषेतील चित्रपट मुधलवनचा रिमेक होता.

या सिनेमात राणी मुखर्जी, अमरीश पुरी, परेश रावल आणि जॉनी लीव्हर यांनी भूमिका केल्या होत्या. हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला आणि तो वर्षातील सर्वात समीक्षकांनी प्रशंसित आणि यशस्वी चित्रपट बनला. दरम्यान, वर्क फ्रंटवर, शंकर त्याच्या राम चरण-स्टार ‘गेम चेंजर’ च्या रिलीजसाठी तयारी करत असताना, अनिल कपूरकडे ‘सुभेदार’ आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या प्रकल्पाचे नेतृत्व सुरेश त्रिवेणी करत आहेत. मार्फ्लिक्स पिक्चर द्वारे या चित्रपटाची ते निर्मिती करणार आहेत. ‘नायक’प्रमाणेच ‘नायक 2’ देखील एक पॉलिटिकल ड्रामा असणार आहे.

‘बागी 2’ सिनेमाला 6 वर्षे पूर्ण, अभिनेता टायगर श्रॉफने शेअर केला सिनेमातील तो खास फोटो

‘नायक 2’ चित्रपटाची कास्टिंग सुरू आहे. या चित्रपटातून एक नवा पॉलिटिकल ड्रामा दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे अनिल कपूर पुन्हा या चित्रपटात दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या चित्रपटा विषयी आणि कास्टिंगबाबत अद्याप टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, या सिनेमासाठी चाहते उत्सुक आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज