Fighter: हृतिक रोशनचा ‘फायटर’ सिनेमा कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? जाणून घ्या
Fighter OTT Release: हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि अनिल कपूरचा (Anil Kapoor) चित्रपट ‘फायटर’ (Fighter Movie) यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रदर्शित झाला. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदाच एकत्र दिसले होते. या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची ही इच्छाही त्याने पूर्ण केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) 200 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आणि आता OTT प्लॅटफॉर्मवर धमाल करण्यास सज्ज आहे.
एरियल ॲक्शन, हृतिक-दीपिकाची केमिस्ट्री आणि उत्तम संगीत असूनही हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला नाही. फायटरचे बजेट 250 कोटी होते आणि चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ 200 कोटींचा गल्ला जमवला. चाहत्यांना होळीपूर्वी भेटवस्तू मिळणार आहेत. हृतिक आणि दीपिकाचा ‘फायटर’ 21 मार्चला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटाची विस्तारित आवृत्ती ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. थिएटर रिलीजच्या वेळी कापलेली दृश्ये देखील ओटीटी (OTT) वर पाहिली जाणार आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील ‘इश्क जैसा कुछ’ आणि ‘बैकर दिल’ ही गाणी काढून टाकली आहेत. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी ‘बेकर दिल’ या गाण्याचा समावेश करण्यात आला. आता दोन्ही गाण्यांसह हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
या चित्रपटाने मल्टिप्लेक्समध्येच चांगला कलेक्शन केल्याची माहिती आहे. आता OTT वर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. फायटरचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. सिद्धार्थ आणि हृतिकने याआधी वॉरमध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटात हृतिक, दीपिका आणि अनिलसोबतच करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.