Download App

खोक्याच्या अडचणी वाढणार, शिरूर पोलिस ठाण्यात चौथा गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Satish Bhosale : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता सतीश भोसले (Satish Bhosale ) याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

  • Written By: Last Updated:

Satish Bhosale : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता सतीश भोसले (Satish Bhosale ) याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शिरुरकासार तालुक्यातील एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी त्याला काल 12 मार्च रोजी उत्तरप्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथून 6 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. बीड आणि उत्तरप्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईत त्याला अटक केली आहे. तर आज त्याला बीडमध्ये आणण्यात येणार आहे. तर दुसरीकडे  वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर पोलिस ठाण्यात (Shirur Police Station) आतापर्यंत त्याच्याविरोधात चार गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे आता दिवसेंदिवस त्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे सतीश भोसले राहत असलेल्या जागेची मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

सिंदखेड राजा येथील वाघ नाम व्यक्तीला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वन्यजीवांना पकडण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळीवरून ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केली त्याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर सतीश भोसलेच्या घरी पोलिसांनी 8 मार्च रोजी केलेल्या झाडाझडतीत गांजा सापडला होता, यावरुन देखील त्याच्यावर NDPS कायद्या अंतर्गत कलम 30 नुसार तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आता वनविभागाने वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सतीश भोसले नेमका कोण

सतीश भोसले हा बीड जिल्ह्यातील शिरुर जवळच्या वस्तीवर राहतो. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. परंतु, सतीश भोसले मात्र महागड्या गाड्या आणि सोन्याचे ब्रेसलेट वापरतो. मागील पाच ते सात वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचा सतीश भोसले कट्टर कार्यकर्ता आहे. शिरुर कासार परिसरात त्याची खोक्या पार्टी नावाने दहशत आहे. खोक्या पार्टी, गोल्ड मॅन या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने अनेकांना मारहाण करुनही त्याच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी कुणी पुढे येत नाही.

सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला हरीण आणि मोरांच्या शिकारीचा शौक होता. खोक्याने आतापर्यंत साधारण 200 पेक्षा जास्त हरिणांना मारल्याचं आजूबाजूच्या गावचे लोक सांगतात. याशिवाय डोंगरात वागूर (पक्षी पकडण्याचे जाळे) लावून कित्येक मोरही खाल्ले आहेत. आठ दिवसांपूर्वी सतीश भोसले आणि त्याचे सहकारी दिलीप ढाकणे यांच्या शेतात हरणं पकडत होते. त्यावेळी दिलीप ढाकणे यांनी त्यांना हरणं पकडण्यास मज्जाव केला.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघात ‘राडा’, कोच गंभीर इंग्लंडला जाणार नाही, कारण काय?

तेव्हा खोक्या भाई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलाला अमानुष मारहाण केली. यामध्ये दिलीप ढाकणे यांचे 8 दात पडले आहेत आणि त्यांचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. ढाकणे यांच्या मुलाचाही पाय फ्रॅक्चर झाला. पण याच खोक्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. कारण बावीकर धाडस करून समोर आले आहेत.

follow us