Download App

ब्रेकिंग! बीडमध्ये पोहोचण्याआधीच ‘खोक्या’ला मोठा धक्का, सतीश भोसलेच्या तडीपार कारवाईला सुरूवात

Satish Bhosale Expelled From Beed District : बीड (Beed) जिल्ह्यातील शिरुर सतिश (Satish Bhosale) उर्फ खोक्या भोसलेचे अनेक कारनामे समोर आलेत. पैशांची उधळण, हेलिकॉप्टर सवारी आणि वेगवेगळ्या रील्समधून सतीश भोसलेचे कारनामे समोर आले होते. त्यानंतर वन विभाग आणि बीड पोलीस या खोक्याच्या मागावर होते. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात (Beed Crime) सापडलाय. परंतु अजून सतीश भोसले बीडमध्ये पोहोचला नाही तेच त्याच्यावर तडीपार कारवाईला देखील सुरूवात झालीय.

पोलिसांनी सतीश भोसले याच्या हद्दपारीला महसूल विभागाला दिलेल्या प्रस्तावाला उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे मान्यता दिल्याचं समोर आलंय. त्यामुळे, आता सतीश भोसलेची बीड जिल्ह्यातून हद्दपारी निश्‍चित (Beed News) झालीय. हा खोक्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. मागील आठवड्याभरापासून खोक्या अनेक कारणांनी चर्चेत आला होता.

डिसेंबर 2025 पर्यंत सेन्सेक्स 105,000 च्या पार जाणार, मॉर्गन स्टॅनलीचा अंदाज; ‘या’ 10 समभागांवर ‘ओव्हरवेट’

बीड जिल्ह्यातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार सतीश भोसले उर्फ ​​खोक्या याला प्रयागराज विमानतळावरून अटक करण्यात आली. महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून प्रयागराज पोलिसांनी त्याला अटक केली (Beed Politics) आहे. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील पोलीस सतीश भोसले उर्फ ​​खोक्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयागराजला रवाना झाले होते. सतीश भोसले विमान पकडून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सतीश भोसले उर्फ ​​खोक्या महाराष्ट्राचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या खूप जवळचा मानला जातोय. मारहाण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला सतीश भोसले नाव कळलं आहे. वन विभागाच्या छाप्यादरम्यान, आरोपी सतीशच्या घरातून अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. सतीशवर वन्य प्राण्यांना मारून त्यांचे अवशेष घरी ठेवल्याचाही आरोप आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रात अनेक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते, अखेर खोक्या पोलिसांच्या गळाला लागलाय.

एअरटेलची एलन मस्कच्या कंपनीसोबत हातमिळवणी! शेअर्सच्या किमतीत वाढ, गुंतवणूक करण्याची योग्य वेळ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले यांच्याविरुद्ध बीड जिल्ह्यात खुनाच्या प्रयत्नाव्यतिरिक्त दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. अलिकडेच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो आणि त्याचे मित्र क्रिकेट बॅटने एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत.

 

follow us