‘खोक्या’भाईमुळे आमदार धस, पोलिस, वनधिकारी अडचणीत ? सहआरोपी करण्यासाठी शिरुर पोलिस ठाण्यावर मोर्चा

Satish Bhosale and Suresh Dhas : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Dhas) हत्याप्रकरणी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे सुरेश धस (Suresh Dhas) हे आता अडचणीत आले आहेत. गुंड सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले (Satish Bhosale) हा धस यांचा कार्यकर्ता आहे. धस यांनी खोक्या हा आपला कार्यकर्ता असल्याचे मान्य केले आहे. त्यानंतर आता विरोधक सुरेश धस यांच्यावर आक्रमक झाले आहे. सुरेश धस, भोसले व पोलिस अधिकाऱ्यांविरोधात बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथे मोर्चा काढण्यात आला. तसेच शिरुर बंद ठेवण्यात आले आहे. खोक्या भोसले हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे आहेत. त्याला सुरेश धस हे वाचवत आहेत. त्यामुळे धस यांनी सहआरोपी करावे, अशी मागणी मोर्चात करण्यात आली आहे.
श्रेया चौधरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘बंदिश बँडिट्स सीझन 2’ मधील अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने
वेगवेगळे गुन्हा दाखल असलेला सतीश भोसले हे फरार झाला आहे. वन्यविभागाने त्याच्या घरावर छापा टाकून हरिण व इतर वन्यप्राणी पकडण्याचे साहित्य, मांस जप्त केले आहे. खोक्या याने ढोकणेला अमानुष मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याविरोधात शिरुर बंदची हाक देण्यात आली होती. तसेच शिरुर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे नवनाथ वाघमारे हे मोर्चात सहभागी झाले होते. सुरेश धस व खोक्याचे संबंध असल्याचे उघड झालेले आहे. शंभर कार्यकर्ते आणि एक खोक्या असे धस यांच्याकडून म्हटले जाते. त्यामुळे दोघांचे कसे संबंध आहेत हे स्पष्ट होत असल्याचे हाके यांनी म्हटले.
साहेब मला माफ करा; पुण्यातील रस्त्यावर लघूशंका करणाऱ्या गौरव आहुजाचे कोणते शिंदे साहेब?
या मोर्चात सहभागी झालेल्या दिलीप ढाकणे, महेश ढाकणे याने सतीश भोसलेवर अनेक आरोप केले. सतीश भोसलेची एसआयटी चौकशी करा. आम्हाला राहायची भीती वाटते रात्रभर झोप येत नाही. माझ्या वडिलांचे दात पडलेत, माझा पाय फॅक्चर झालाय. त्याने कमीत कमी 200 हरणे मारले आहेत. त्याला लवकरात लवकर अटक करा. आमच्या जीवाला पुन्हा धोका आहे, असे महेश ढाकणे याने म्हटले आहे.
मोर्चाकऱ्यांच्या मागण्यांमुळे वन व पोलिस अधिकारी गोत्यात
सतीश भोसले उर्फ खोक्या आणि त्याचे सहकारी हरणाची तस्करी करतो. त्यातून भरपूर पैसे कमविले आहे. त्यासाठी त्याला वनविभागाचा राजकीय वरदहस्त आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी. तसेच वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, ढाकणे कुटुंबीयाला मारहाण झाल्यानंतर शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक धोकरट यांनी ढाकणे कुटुंबाची तक्रार घेतली नाही.यामुळे ढाकणे कुटुंबाला पोलीस अधीक्षकांकडे जावे लागले. परंतु त्या ठिकाणीही तक्रार घेतली नाही, याबाबतची चौकशी करावी, अशी मागणी केलीय. त्यामुळे वनधिकाऱ्यांसह पोलिस अधिकारीही गोत्यात येण्याची शक्यता आहे. या सर्व घटनाक्रमामध्ये ओबीसी समाजाच्या गरीब कुटुंबावर पोलीस प्रशासनाकडून अन्याय कोणाच्या दबावाखाली झाला. याबाबतची चौकशी करावी, आमदार सुरेश धस आरोपीस वाचवण्यासाठी उघड सहकार्य करत असल्याचे दिसून येत असताना त्यांना सहआरोपी करावे.यासह सतीश भोसले यांचे आणखी कुठले अवैधधंदे आहेत. या सर्वांचा शोध घ्यावा, अशा सह मागण्या करण्यात आल्यात.