Download App

Satyajeet Tambe : हॉल तिकीट लिक होणं अतिशय गंभीर बाब, कठोर कारवाई करा…

स्पर्धा परिक्षांबाबत घडत असलेल्या प्रकरणे वारंवार घडताहेत, सत्ताधाऱ्यांनी कठोर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे. एमपीएससीच्या संयूक्त पूर्व परीक्षाच्या आधीच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटाची माहिती फुटल्याप्रकरणी आमदार सत्यजित तांबेंनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, एमपीएससीच्या संयूक्त पूर्व परीक्षाच्या आधीच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीटाची माहिती फुटली आहे. हजारो विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट टेलिग्रामवर टाकण्यात आले असून ते व्हायरल झाले आहे. विद्यार्थ्यांचे माहिती सार्वत्रिक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सुमारे 90 हजारो उमेदवारांची माहिती सार्वत्रिक झाली आहे असून एमपीएससीने याबाबत खुलासा केला असून केवळ विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट लिक झाले आहे. त्याचे आधार कार्ड व इतर माहिती लिक झालेली नाही. तसेच प्रश्नपत्रिका लिक झालेली नसल्याचं स्पष्टीकरण एमपीएससीकडून देण्यात आलंय.

अक्षय तृतीयेचा मुहर्ताला सोने खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी

या प्रकरणावर आमदार तांबे ट्विटमध्ये म्हणाले, “ही एक अतिशय गंभीर बाब आहे, स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटण्याची आणि इतर फेरफारची प्रकरणे आपण वारंवार पाहत आलो आहोत.

आलियाची चप्पल उचलणं रणबीरला पडलं महागात! चाहते भडकले अन् म्हणाले….

सरकार कोणाचेही असले तरी परिस्थिती बदलत नाही. याचा अर्थ या चुकांना नोकरशाही जबाबदार असून सत्ताधारी पक्षांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे” अशी मागणी आमदार तांबेंनी केली आहे.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ‘दगडूशेठ’ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

दरम्यान, फक्त आयोगाच्या वेबसाईटवरुन या परिक्षांचे प्रवेश पत्र काढण्यात येते. दुसरा कोणी यामध्ये हस्तक्षेप करु शकत नाही. त्यामुळे लोकसेवा आयोगाच्या वेबसाईवरुन विद्यार्थ्यांची माहिती लीक कशी झाली. याबाबत लोकसेवा आयोगाकडून तपास सुरु आहे.

Tags

follow us