Corona : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या राज्यांना सूचना…
देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 8 राज्यांना विशेष लक्ष ठेवण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राकडून राज्यांना खबरदारीचे उपाय म्हणून कारवाई करण्याबाबतही निर्देश दिलेत.
…हार को सामने देखकर जो लढता है वो खिलाडी होता है; बावनकुळेंकडून कुस्तीगीरांना प्रोत्साहन
देशभरात अद्यापही कोरोना विषाणूचा नायनाट झालेला नसून उत्तर प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरियाणासह दिल्लीत कोरोनाच्या बचावासाठी ज्या उपाययोजना असतील त्या राबवण्यात याव्यात, तसेच हलगर्जीपणा करु नये, असे आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केले आहे.
म्हणून ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमाला एवढी गर्दी, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण…
राजेश भूषण म्हणाले, कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी दक्षता महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तसेच मार्चपासून देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 20 एप्रिल रोजी देशात कोरोनाचे 10, हजार 262 नवीन रुग्ण आढळले आहेत.
खारघरमधील मृत्यूनंतरही ठाण्यात दुपारी १२ वाजता सरकारी कार्यक्रम; जितेंद्र आव्हाड संतापले
तसेच देशभरात संसर्गाचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही.
दरम्यान, रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या कमी आहे. ज्या राज्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर संसर्ग वाढत आहे तेथे सखोल देखरेखीची गरज असल्याचं आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले आहेत.