Savitribai Phule Jayanti : स्त्री शिक्षणासाठी प्रचंड खस्ता खाणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणजे सावित्रीबाई फुले. (Savitribai Phule Jayanti) 3 जानेवारी 1831 मध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे कोणत्याही प्रकारचं स्त्री स्वतंत्र नसलेल्या समाजात आणि काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. त्या काळातील प्रथापरंपरांमध्ये अगदी वयाच्या नव्याच वर्षी त्यांचा तेरा वर्ष वयाच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला.
आंध्र प्रदेशात रेड्डी बहीण-भाऊ वेगळे का झाले? काँग्रेसला मिळणार संजीवनी
मात्र हाच विवाह त्यांना समाजकार्य आणि स्त्रियांच्या उद्धारासाठी कार्य करण्याचा कारण ठरला. कारण त्यांचे पती ज्योतिबा फुले हे एक समाज सुधारक होते. ज्यांच्या पुढाकाराने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ज्याची सुरुवात त्यांनी इतरांपासून न करता स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यापासून केली. मुलींची पहिली शाळा काढण्यापासून विधवा अनाथ मुलांना आधार देण्यापर्यंत अशा प्रकारच्या अनेक सत्कार्य या दांपत्याने करत पिढ्यान् पिढ्यांचा साठी स्त्री शिक्षणाची वाट मोकळी करून दिली.
’60 वर्षांत नाही झालं ते CM शिंदेंच्या आदेशाने सुरु’; शंभूराज देसाईंची टोलेबाजी
या संघर्षमय प्रवासामध्ये कर्मठांनी कधी सावित्रीबाईंवर अक्षरशः शेण फेकलं. तर कधी शिक्षिकेचं कार्य करते म्हणून हिणवलं. मात्र ज्योतिबा कधीही डगमगले नाहीत. त्यामुळेच एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. असं म्हटलं जातं एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते. ती म्हण मात्र या दांपत्याने उलटी करून दाखवली आणि ज्योतिबांच्या खंबीर पाठिंब्याने सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची धुरा समर्थपणे पेलली.
पुढे सत्यशोधक समाजाची स्थापना केली खरी मात्र ज्योतिरावांचे निधन झालं. त्यामुळे सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सावित्रीबाई मराठी या माध्यमातून त्यांनी आपल्या विचारांचा प्रसार साहित्याच्या माध्यमातून केला. याच दरम्यान 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. हा जीवघेणा आजार अनेकांची जीव घेत होता. त्यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाई फुले यांची सेवा करायला सुरुवात केली आणि हीच सेवा करताना 10 मार्च 1897 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी सावित्रीबाईंची प्राणज्योत मालवली.