Download App

आंध्र प्रदेशात रेड्डी बहीण-भाऊ वेगळे का झाले? काँग्रेसला मिळणार संजीवनी

Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांची बहीण आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वायएस शर्मिला (YS Sharmila) लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वायएस शर्मिला यांना महत्त्वाची भूमिका देऊ शकते.

या वर्षी होणाऱ्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्या काँग्रेसच्या वतीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असेही मानले जात आहे. त्यांचे हे पाऊल आंध्र प्रदेशात काँग्रेसला बळकट करण्यासाठी महत्त्वाची बाब ठरू शकते. काँग्रेसला आशा आहे की वायएसआरसीपी सोडून गेलेले लोक आता काँग्रेसमध्ये सामील होतील आणि काँग्रेस विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करू शकेल.

जगन मोहन रेड्डी यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला
वायएस जगन मोहन रेड्डी यांनी त्यांचे काका वायएसआरसीपीचे माजी खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांना बहीण वायएस शर्मिला यांचे मन वळविण्यासाठी पाठवले होते परंतु चर्चा अयशस्वी झाली.

मोठी बातमी! सरकार आणि वाहतूकदारांमध्ये समेट! ट्रक चालकांना संप मागे घेण्याचे आवाहन

जगन मोहन रेड्डी यांची बहीण अन्य पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर राज्यभरात त्यांचा प्रभाव आणि प्रतिमा प्रभावित होईल अशी जगन मोहन रेड्डी यांना भीती आहे. दरम्यान शर्मिला यांनी 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी झालेल्या बैठकींमध्ये YSRCP मध्ये सामील होण्यास स्पष्टपणे नकार दिला होता, असे एका सूत्राने सांगितले.

2021 मध्ये भाऊ आणि बहीण वेगळे झाले
YS शर्मिला यांनी तेलंगणामध्ये स्वतःची संघटना स्थापन केल्यानंतर जुलै 2021 मध्ये भाऊ-बहीण राजकीयदृष्ट्या वेगळे झाले होते. वायएसआरसीपी आणि वायएसआरटीपी या दोन्ही पक्षांची स्थापना वायएसआरचा वारसा पुढे नेण्याच्या आणि “राजन्ना राज्यम” (वायएसआरचे राज्य) परत आणण्याच्या उद्देशाने करण्यात आली.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकार अ‍ॅक्शन मोडवर, मागासलेपण सिद्ध करण्यासाठी प्रश्नावली पाठवली

YS शर्मिला यांनी आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश केल्यामुळे राज्यात एकाच वेळी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाऊ-बहिणीचा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा परिणाम जगन मोहन रेड्डी आणि काँग्रेस यांच्या भविष्यातील आघाडीवर होऊ शकतो.

शर्मिला यांनी हे पाऊल का उचलले आहे?
असे मानले जाते की वायएस शर्मिला राजकीय स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नात आहेत आणि जगन रेड्डी यांनी वायएसआरचा वारसा हायजॅक केला आहे. वायएसआरसीपीच्या राष्ट्रीय संयोजक म्हणून काम केल्यानंतर, शर्मिला यांनी तिच्यी आई वायएस विजयम्मा यांच्यासह तेलंगणामध्ये वायएसआरटीपी सुरू केली होती. त्यांनी विविध मुद्द्यांवर के. चंद्रशेखर राव (KCR) यांच्या नेतृत्वाखालील BRS सरकारवर टीका केली आहे.

follow us