धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने 65 वर्षीय वृद्धाला चिरडलं

धक्कादायक! माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने 65 वर्षीय वृद्धाला चिरडलं

 Andhra Pradesh Crime News Elderly Man Crushed To Death : माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने (Former CM Jagan Mohan Reddy) 65 वर्षीय वृद्धाला चिरडल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. ही घटना आंध्र प्रदेशामध्ये घडली आहे. माजी मुख्यमंत्री (Andhra Pradesh) वायएस जगन मोहन रेड्डी सट्टेनपल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाडीने वायएसआरसीपी कार्यकर्ते चिली सिंगैया (65) यांना चिरडले. माजी मुख्यमंत्र्यांचा ताफा रॅलीसह पुढे जात (Crime News) होता, परंतु गाडीच्या चाकाखाली एक व्यक्ती चिरडली गेली.

ताफ्यातील वाहनाने चिरडले

गुंटूरचे एसपी सतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सिंगैया यांना जगन यांच्या ताफ्यातील एका वाहनाने चिरडले. जगन यांनी दोन दिवसांपूर्वी सट्टेनपल्ली मतदारसंघातील रेंटपल्ला गावाला भेट देऊन सुमारे एक वर्षापूर्वी आत्महAndhra Pradeshत्या केलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाचे सांत्वन केले होते. ताडेपल्ली ते रेंटपल्ला गाव या संपूर्ण प्रवासात जगन यांच्या ताफ्यामागे मोठा जमाव होता.

ट्रॉफी जिंकल्यानंतर विजयी मिरवणूक काढता येणार क? BCCI चे नवे 8 नियम काय?

100 लोकांनाच परवानगी

पोलिसांनी केवळ तीन वाहनांना आणि सुमारे 100 लोकांना ताफ्यासोबत जाण्याची परवानगी दिली होती तरी, वाटेत मोठी गर्दी जमली. त्यांनी जगन यांच्या वाहनाला घेरले होते. उपस्थित असलेल्यांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते सिंगैया यांचाही समावेश होता. त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर फुले उधळण्यासाठी जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती मिळतेय.

वर्धापन दिनानंतर ठाकरेंना मुंबईत पहिला मोठा धक्का! दोन माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

गाडी पुढे सरकली अन्…

सर्व बाजूंनी गर्दी वाढत होती, पोलीस नियंत्रण राखू शकले नाहीत. या झटापटीत, सिंगैया यांना पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी खाली ढकलले. परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांना किंवा चालकाला परिस्थितीचे लक्षात आली नाही. गाडी पुढे सरकली आणि सिंगैया यांचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला. गस्तीवर असलेल्या स्थानिक एएसआय मनोहर यांना सिंगैया यांच्यावर अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांना रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना पोहोचताच मृत घोषित केले.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. वायएसआरसीपी नेत्यांनी शांतपणे सिंगैया यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि पक्षाकडून 10 लाख रुपयांचा सानुग्रह अनुदानाचा धनादेश दिला. तेलुगू देसम संसदीय पक्षाचे (टीडीपीपी) नेते लवू कृष्णदेवरायलू यांनी या घटनेवर टीका केलीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube