Andhra Pradesh : फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, 8 कामगारांचा भाजून मृत्यू तर 7 कर्मचारी गंभीर जखमी

Andhra Pradesh : फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, 8 कामगारांचा भाजून मृत्यू तर 7 कर्मचारी गंभीर जखमी

Andhra Pradesh firecracker factory explosion : आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) अनाकापल्ली जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट ( firecracker factory explosion ) झाला. या स्फोटात कारखान्यात काम करणाऱ्या 8 कामगारांचा मृत्यू झाला. तर 7 जण गंभीर जखमी झालेत. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

मलाही काम करताना तिच्याकडून उर्जा मिळाली, मांजेकरांनी केलं ‘देवमाणूस’मधील अभिनेत्रीचं कौतुक 

अनाकापल्लीचे पोलिस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला. प्राथमिक माहितीनुसार, हा स्फोट फटाके बनवणाऱ्या युनिटच्या आत झाला. स्फोटानंतर आग वेगाने पसरली आणि संपूर्ण युनिटला आगीने वेढून घेतले. फॅक्टरीत ठेवलेल्या फटाक्यांच्या मोठ्या साठ्याला आग लागली, त्यामुळं मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण युनिट बघता-बघता ढिगाऱ्यात नष्ट झाले. दुर्घटनेच्या वेळी कारखान्यात 15 कर्मचारी काम करत होते. हा स्फोट इतका मोठा होता की, आजूबाजूच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

Sanjana Ghadi : मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का! संजना घाडींचा शिंदे गटात प्रवेश 

दादी रामलक्ष्मी, पुरम पापा, गुम्पिना वेणू, सेनापती बाबुराव, मनोहर, देवरा निरमाला, अप्पीकोंडा तथाबाबू आणि संगारी गोविंदू अशी मृतांची नावे आहेत. सर्व पीडित हे काकीनाडा जिल्ह्यातील समार समलकोट भागातील रहिवासी होते. पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह बाहेर काढले.

मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त
दरम्यान, मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडूंनी अनकापल्ली जिल्ह्यातील कोटावुराटला येथील फटाके उत्पादन युनिटमध्ये झालेल्या स्फोटात 8 कामगारांच्या मृत्युबद्दल शोक व्यक्त केला. घटनेची माहिती गोळा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि राज्याच्या गृहमंत्री अनिता यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी घटनेची माहिती घेतली आणि मदतकार्यात गती आणण्याच्या सुचना दिल्या.

जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत. सरकार पीडितांच्या कुटुंबांसोबत आहे, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय. तसेच अधिकाऱ्यांना या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि त्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी सांगितले की, आगीच्या दुर्घटनेत दोन महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube