Sanjana Ghadi : मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का! संजना घाडींचा शिंदे गटात प्रवेश

Sanjana Ghadi  : मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का! संजना घाडींचा शिंदे गटात प्रवेश

Sanjana Ghadi Entry To Shinde Group : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलच यश मिळालं मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केल्याचं चित्र दिसून आलं. त्यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष उद्धव ठाकरे गटाला गळती सुरु झालीयं. शिवसेनेच्या प्रवक्ता संजना घाडी (Sanjana Ghadi) यांच्यासह पती संजय घाडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलायं. त्यामुळे हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.

बच्चू कडू म्हणाले, “विखे पाटील मतांचे भिकारी”, सुजय विखेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “बच्चू कडूंना..”

संजना घाडी मुंबईतील ठाकरे गटाच्या बड्या नेत्या मानल्या जाता. कित्येक वर्ष त्या महापालिकेच्या नगरसेविका राहिल्या आहेत. तर उपनेते असतानाही त्यांना प्रवक्त्यांच्या यादीतून वगळण्यात आलं होतं. तेव्हापासून संजना घाडी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेरीस संजना घाडी यांचं प्रवक्तेपदी नावही जाहीर करण्यात आलं होतं. तरीही आज संजना घाडी यांनी आज शिंदे गटात प्रवेश केलायं.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मंत्र देशाला दिला, त्यांचे विचार जगभरात नेणार : अमित शाह

पक्षप्रवेशावेळी बोलताना संजना घाडी म्हणाल्या, एकनाथ शिंदे हे दिघेसाहेब आणि बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले जमिनीवरचे कार्यकर्ते आहेत. शिंदे गटाला विधानसभेत जनतेकडून कौल मिळाला अन् सत्य बाहेर आलं. ठाकरे गटात कामाला संथ गती आणि चांगलं कार्यकर्त्याची वेगळ्याच राजकारणामुळे गळचेपी होत होती. ज्यांच्यासाठी आम्ही कामकरीत होतो तिथे जर आम्हाला स्थान मिळणार नसेल, त्यातूनच आम्ही विचार केला की लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिंदे गटात आम्ही काम करु, असं संजना घाडी यांनी स्पष्ट केलंय.

दरम्या, ठाकरे गटाच्या नेत्या संजना घाडी यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश घेतला असून संजना घाडी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube