बच्चू कडू म्हणाले, “विखे पाटील मतांचे भिकारी”, सुजय विखेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “बच्चू कडूंना..”

Sujay Vikhe And Bacchu Kadu

Sujay Vikhe replies Bacchu Kadu : प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी (Bachhu Kadu) शिर्डीतील भिक्षुक प्रकरणावरून मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर टीका केली होती. यावर आता माजी खासदार सुजय विखे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल येथे येऊन अपशब्द बोलणं, हे काय आम्हाला नवीन नाही. वर्षानुवर्ष अनेक लोक आले आणि अपशब्द वापरून गेले, परंतु त्याचा मतदार व गोरगरीब जनतेवर कुठलाही परिणाम झालेला नाही. कारण जनता नेहमीच विखे पाटील परिवाराच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे कुणी कितीही टीका केली तर त्याचा परिणाम विखे पाटील परिवारावर होत नाही. बच्चू कडूंना वीरभद्र महाराज सद्बुद्धी देवोत हीच प्रार्थना करतो’, असे सुजय विखे (Sujay Vikhe) म्हणाले.

श्री वीरभद्र सार्वजनिक देवळे व उत्सव ट्रस्ट, राहाता यांच्या वतीने आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव, श्री नवनाथ (मायंबा) देवाची यात्रा व श्री वीरभद्र देवाच्या यात्रेला उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. तसेच नवनाथ महाराज मंदिर परिसरामध्ये हायमॅक्सचे लोकार्पण देखील डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

आमदार संदीप क्षीरसागरांनी धमकावल्यानंतर पालिका कर्मचाऱ्याची थेट पोलिसांत तक्रार; दमानिया आक्रमक

बच्चू कडू यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारला असता सुजय विखे म्हणाले, भिक्षुक मृत्यू दुर्दैवी आहेत. त्याला नाकारून चालणार नाही. मात्र, त्याच्या मागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. मयतांच्या कुटुंबांबरोबर संपूर्ण विखे पाटील परिवार आहे. मी स्वतः देखील त्यांच्या परिवाराशी बोललो आहे, भविष्यात मदत लागल्यास विखे पाटील परिवार सदैव त्यांच्यासोबत उभा राहील आणि प्रशासनाच्या वतीने जिल्हा रुग्णालयात जर कुठे हलगर्जीपणा झाला असेल तर त्यावर कारवाई केली जाईल असे आधीच आश्वासन देण्यात आलेले आहे, त्यामुळे निश्चितपणे योग्य ती कारवाई होईल असे सुजय विखेंनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते बच्चू कडू?

शिर्डीतील भिक्षेकरू मृत्यू प्रकरणानंतर बच्चू कडू यांनी काल पीडित कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार टीका केली. ते तर मतांचे भिकारी आहेत. विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुका आल्या की भीक मागतात. खरे भिकार तर तेच आहेत. प्रशासनाच्या ताब्यात असलेली माणसं मरत असतील तर सरकारी कार्यालये हवीतच कशाला? असा सवाल माजी आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला होता.

मोहिते पाटलांना रिझर्व बँकेचा दणका! शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द

follow us
  • fb
  • instagram
  • youtube