मोहिते पाटलांना रिझर्व बँकेचा दणका! शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द

मोहिते पाटलांना रिझर्व बँकेचा दणका! शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द

Shankarrao Mohite Patil Cooperative Bank’s license cancelled by Reserve Bank of India : राज्याच्या राजकारणातील मोठ राजकीय घराणं असलेल्या अकलूजच्या मोहिते पाटलांना भारतीय रिझर्व बँकेने दणका दिलाय कारण मोहिते पाटलांच्या माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेकडे सध्या पुरेसे भांडवल नाही आणि उत्पन्नाच्या संधी देखील नाही त्यामुळे बँकिंग नियमन कायद्याचे त्यांच्याकडून पालन केलं जात नाही तसेच ही बँक चालू राहणं ठेवीदारांच्या हितासाठी धोकादायक आहे कारण ते ठेवीदारांचे पैसे देखील परत देऊ शकणार नाहीत. या सर्व कारणांमुळे भारतीय रिझर्व बँकेने 9 एप्रिल रोजी या बँकेचा परवाना रद्द करण्यास आदेश काढला तर शुक्रवारी 11 एप्रिल पासून या बँकेला काम करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

13 एप्रिल रोजी आकाशात दिसणार ‘गुलाबी चंद्र’; जाणून घ्या कुठे आणि कसा पाहता येणार?

तसेच आरबीआयने या बँकेच्या निबंधकांना बँक बंद करून बँकेवर प्रशासक नेमण्याचेही आदेश दिले आहेत त्यामुळे लवकरच या बँकेच्या कारभाराची सूत्र प्रशासकाच्या हाती सुपूर्द केले जाणार आहेत तसेच या बँकेचे ठेवीदारांना पाच लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विम्याचे संरक्षण देण्यात आलेले आहे त्यामुळे ते यावर दावा करू शकतात.

महायुतीमध्ये उत्तम समन्वयाने कार्य सुरू पण माध्यमांमध्ये सूत्र नावाचे सूत्रधार, आनंद परांजपेंचे प्रत्युत्तर

तर समोर आलेल्या आकडेवारीनुसार मोहिते पाटलांच्या या बँकेकडे 99.72% ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी डीआयसीजी कडून मिळण्याचा अधिकार आहे तसेच 31 मार्च पर्यंतच्या बँकेच्या संबंधित ठेवीदारांकडून मिळालेल्या संमतीच्या आधारे डीआयसीजीसी कडून विमाकृत ठेवीन पैकी सुमारे 47.89 कोटी रुपयांचं अगोदरच वाटप करण्यात आला आहे. या बँकेचे मुख्यालय अकलूज येथे होते तर बँकेच्या शाखा पुणे सोलापूर टेंभुर्णी करमाळा इंदापूर या ठिकाणी होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube