13 एप्रिल रोजी आकाशात दिसणार ‘गुलाबी चंद्र’; जाणून घ्या कुठे आणि कसा पाहता येणार?

Pink Moon 2025

Pink Moon 2025 : या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच 13 एप्रिल रोजी आकाशात एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. 13 एप्रिलच्या रात्री लोकांना गुलाबी चंद्र पाहता येणार आहे. भारतात रविवारी 13  एप्रिल 2025 रोजी पहाटे 5 वाजता गुलाबी चंद्र (Pink Moon 2025) दिसणार आहे तर अमेरिकेत आज रात्री (12 एप्रिल) गुलाबी चंद्र पाहता येणार आहे.

गुलाबी चंद्र म्हणजे काय?

वसंत ऋतूतील पहिल्या पौर्णिमेला पिंक मून असे नाव देण्यात आले आहे. एक जंगली फूल आहे ज्याचे नाव फ्लॉक्स आहे. हे फूल वसंत ऋतूमध्ये उमलते; उत्तर अमेरिकेत, या फुलाचा बहर म्हणजे हवामानात काही मोठे बदल होणार आहेत. या बदलांना गुलाबी चंद्राची व्याख्या म्हणून वर्णन केले आहे. यावेळीचा गुलाबी चंद्र, लोक त्याला मायक्रो मून देखील म्हणत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर खूप जास्त असेल, त्यामुळे यावेळी चंद्र नेहमीपेक्षा थोडा लहान आणि कमी तेजस्वी दिसेल.

महायुतीमध्ये उत्तम समन्वयाने कार्य सुरू पण माध्यमांमध्ये सूत्र नावाचे सूत्रधार, आनंद परांजपेंचे प्रत्युत्तर

गुलाबी चंद्र पाहता येईल का?

जर आकाश निरभ्र असेल तर तुम्ही देखील तुमच्या छतावरूनही गुलाबी चंद्र पाहू शकता आणि या अद्भुत दृश्याचे साक्षीदार होऊ शकता.

सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, ‘त्या’ प्रकरणात हर्षवर्धन सपकाळांची मागणी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या