2019 ला दानवेंनी पैसे वाटून माझा पराभव केला; चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा

2019 ला दानवेंनी पैसे वाटून माझा पराभव केला; चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा

Chandrkant Khaire On Ravsaheb Danve : 2019 साली रावसाहेब दानवे यांनी पैसे वाटून माझा पराभव केला असल्याचा खळबळजनक दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrkant Khaire) यांनी केलायं. जालन्यात एका विवाह सोहळ्याला भेट देण्यासाठी आलेले असतांना खैरे यांनी पत्रकारांशी संवाद साधलायं.

महापालिकेचा एकही रुपया थकवलेला नाही, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डीनचं स्पष्टीकरण

पुढे बोलताना खैरे म्हणाले, रावसाहेब दानवेंनी सिग्मा हॉस्पिटलमध्ये बसून माझा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव केला. आमच्याच नगरसेवक आणि नेत्याला पैसे देऊन दानवेंनी मला पराभूत केलं. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत दानवेंना देवानं जालन्यात पराभूत केलं असल्याचा टोला खैरे यांनी दानवेंना मारलायं.

2029 मध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणुका होणार असून आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनतील असं भाकीत छत्रपती संभाजीनगरचे चंद्रकांत खैरे यांनी वर्तवलं आहे. तसेच मैदान पुढे आहे आम्ही पुन्हा परत येणार असा इशारा देखील खैरे यांनी भाजपला दिलायं.

स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरण; राहुल गांधी यांची विनंती विशेष न्यायालयाकडून मान्य

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कुठे अन् उद्धव ठाकरेंचा पक्ष कुठे? हा पक्ष पुढील विधानसभा निवडणुकीत दिसणार नाही, अशी टीका भाजपाचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजपा स्थापनादिनाच्या आपल्या भाषणातून केली होती. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर पलटवार केलायं.

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकसभा अन् राज्यसभेतील खासदारांनी मतदान केले. त्यानंतर संतापलेल्या भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीकेची झोड उठवली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube