Bachhu Kadu : जरांगेंच्या मागे काही शक्ती काम करतेय, त्यांनी बळी पडू नये; बच्चू कडूंचा आरोप

Bachhu Kadu : जरांगेंच्या मागे काही शक्ती काम करतेय, त्यांनी बळी पडू नये; बच्चू कडूंचा आरोप

Bachhu Kadu : आमदार बच्चू कडू ( Bachhu Kadu ) यांनी आरोप केला आहे की, जरांगे यांच्या आंदोलनाला वेगळं वळण यासाठी काही शक्ती काम करत आहेत. मात्र त्यांनी त्याला बळी पडू नये. असा आरोप कडू यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान आज देवेंद्र फडणवीसांकडूनच ( Devendra Fadnvis ) हा मला संपवण्याचा डाव असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे अचनाकपणे देवेंद्र फडणवीसांवर धावले आहेत. उपोषणस्थळीच मराठा समाजबांधवांना झुगारुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्याकडे निघाले आहेत.

एक हजार कोटींच्या रस्त्याचे लोकार्पण मंत्री गडकरींच्या हस्ते; सुजय विखेंची माहिती

त्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले आहेत की, जरांगे पाटील यांनी प्रचंड प्रामाणिकपणे मेहनत केली. लढाई सुरू ठेवली. मात्र याला जाणीवपूर्वक वेगळं वळण लागावं. अशी काही लोक करत असतात. त्याला त्यांनी बळी पडू नये एवढी अपेक्षा आहे. आंदोलनाची दिशा बदलली तर ते चुकीचं होईल आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जरांगे यांनी टोकाची भूमिका घेऊ नये.

खोके सरकार बिल्डरांची हांजीहांजी करणं सोडून जनतेची सेवा कधी करणार?, आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

याला वेगळं वळण लागावं यासाठी काही शक्ती काम करत आहे. जरांगे यांनी अर्धवट माहिती घेऊन जर पाऊल उचलत असतील तर त्याचे परिणाम समाजावर पडेल. जरांगे यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, जीव महत्त्वाचा आहे. हे आंदोलन जीव घेण्यासाठी, देण्यासाठी उभं केलं नाही. यासाठी मार्ग काढण्यासाठी आपण प्रयत्न करू. घेतलेली टोकाची भूमिका जरांगे पाटलांनी थांबवावी. जरांगेंसोबत माझं बोलणं झालं नाही, पण मी उद्या जाण्याचा प्रयत्न करतो. असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्यावर गंभीर स्वरुपात आरोप करण्यात येत आहेत. देवेंद्र फडणवीसांकडूनच (Devendra Fadnvis) हा मला संपवण्याचा डाव असल्याचं म्हणत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे अचनाकपणे देवेंद्र फडणवीसांवर धावले आहेत. उपोषणस्थळीच मराठा समाजबांधवांना झुगारुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्याकडे निघाले आहेत. मात्र, समाजबांधवांकडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून येत आहे. अंतरवली सराटीत उपोषणस्थळी गोंधळ सुरु असल्याची परिस्थिती झाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube