Satyashodhak : ‘सत्यशोधक’ (Satyashodhak) या चित्रपटातून समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकताच ‘सत्यशोधक’चा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटामाटात पार पडला.
‘ओबीसो असो वा मराठा समाज…’; आरक्षणावर खासदार विखेंचे मोठे विधान
यावेळी ज्योतिरावांच्या भूमिकेतील अभिनेते संदीप कुलकर्णी आणि सावित्रीमाईंच्या भूमिकेतील अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी त्यांच्या चित्रपटातील लूकमध्ये एंट्री घेतली. यामुळे उपस्थितांचे लक्ष वेधले आणि साक्षात हे प्रेमळ जोडपं आपल्या समोर उभं राहिलं आहे. असा भास उपस्थितांना झाला.
Ram Shinde : आमच्या घरात काय चाललंय ते पाहण्यापेक्षा स्वतःच पाहा…राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला
‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या यापूर्वी आलेल्या टिझर आणि लूक रिव्हीलमुळे आधीच या चित्रपटाची जोरदार चर्चा झाली होती. आता रिलीज झालेल्या ट्रेलरमुळे म. फुले आणि सावित्रीमाईंच्या माहीत नसलेल्या पैलूंचा उलगडा झाला. यामुळे चित्रपट नक्की कसा असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीचा मुहूर्त ठरला! भाजप ‘या’ दिवशी यादी जाहीर करणार
संदीप कुलकर्णी, राजश्री देशपांडेंसह गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी ही कलाकार मंडळी चित्रपटात झळकतील. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. यावेळी इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवाय चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळीही या कार्यक्रमास आवर्जून आली होती.
समता फिल्म्स निर्मित, अभिता फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत आणि निलेश जळमकर लिखित-दिग्दर्शित , संकल्पना – राहुल तायडे, वैशाख वाहुरवाघ सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रविण तायडे, आप्पा बोराटे, भिमराव पट्टेबहादूर, सुनील शेळके, विशाल वाहूरवाघ हे आहेत, तर सहनिर्माते राहुल वानखडे, बाळासाहेब बांगर, हर्षा तायडे, प्रतिका बनसोडे, प्रमोद काळे हे आहेत. शिवा बागुल आणि महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. निर्मिती मध्ये निखिल पडघन, देवानंद मोहोड, मंगला वानखडे आणि निता गवई याचे मोलाचे योगदान आहे. विशेष म्हणजे रिलायन्स एंटरटेंनमेंट मार्फत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट 5 जानेवारी, 2024 रोजी प्रदर्शित होईल.