SC on Bullock cart Races : महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ अशी ओळख असलेल्या बैलगाडा शर्यतींचं भवितव्य आज ठरणार आहे. सुप्रीम कोर्ट बैलगाडा शर्यतींना परवानगी देयची की नाही, यावर महत्त्वाचा निर्णय देणार आहे. गेल्या वेळी झालेल्या सुनावणीनंतर घटनापीठाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.
तामिळनाडूतील जलीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींवर आज सुप्रीम कोर्ट एकत्रित निर्णय देणार आहे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल आज येणार आहे. त्यामुळे कोर्ट आज काय निर्णय देणार याकडे बैलगाडा मालकांचं लक्ष लागलं आहे.
‘एमआयडीसी’साठी रोहित पवारांचे उपोषणाचे हत्यार ! सरकारला दिली ‘डेडलाइन’
दरम्यान महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणाशी जोडलेला हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. 2011 मध्ये केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने एक नोटीफिकेशन जारी केलं होत. त्यामध्ये स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या ज्या प्राण्यांवर बंदी घालण्यात आली होतीय त्यामध्ये बैलाचा समावेश करण्यात आला होता.
दुष्काळात तेराव्या महिन्यासारखंच ठाकरेंचं सरकार होतं, फडणवीसांचा हल्लाबोल…
त्यानंतर बैलगाडा शर्यतींवर बंदी घालण्यात आली. मात्र राज्य सरकारने अनेकदा ही बंदी उठवण्याचा प्रयत्न केले पण प्राणीमित्र संघटनांनी दाखल केलेल्या याचिकांमुळे यावर पुन्हा बंदी यायची. त्यानंतर 2021 मध्ये अखेर ही बंदी उठवण्यात आली. तसेच सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत काही अटी शर्थींसह ही परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आज कोर्ट काय निर्णय देणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
राहुल नार्वेकरांना कोणाचाही सल्ला घेण्याची गरज नाही, असीम सरोदेंनी सांगितलं कारण…
गेल्या दोन वर्षांत बैलगाडा शर्यतींचा थरार संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. तो सुरू राहणार का? याचं उत्तर आजच्या निकालात मिळणार आहे. डिसेंबरमध्ये तब्बल 10 दिवस या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालायाने ही निकाल राखून ठेवला होता. आज त्यावर न्यायमुर्ती जोसेप यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमुर्तींचं खंडपीठ सकाळी साडे दहा वाजता हा निकाल देणार आहे.