‘एमआयडीसी’साठी रोहित पवारांचे उपोषणाचे हत्यार ! सरकारला दिली ‘डेडलाइन’

  • Written By: Published:
‘एमआयडीसी’साठी रोहित पवारांचे उपोषणाचे हत्यार ! सरकारला दिली ‘डेडलाइन’

Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघात मागील सरकारने एमआयडीसीला मान्यता दिली आहे. परंतु त्याची अधिसूचना अद्याप निघालेली नाही. त्यासाठी आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेत निवेदन दिले आहे. एमआयडीसीची अधिसूचना न काढल्यास थेट उपोषण करण्याचा इशारा रोहित पवारांनी दिला आहे. तसेच सरकारला अधिसूचनेसाठी डेडलाइनही दिली आहे.

कर्जत तालुक्यातील खंडाळा व पाटेगाव येथे एमआयडीसीला मान्यता देण्यात आलेली आहे. त्याची अधिसूचना ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या दिवशी ३१ मे २०२३ रोजी जाहीर करावी. तर इतर कायदेशीर बाबी राजर्षी शाहू महाराज जयंतीपर्यंत (२६ जून २०२३) पूर्ण करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.

अजितदादांचा फोटो भाजपच्या बॅनरवर लावणाऱ्या ‘त्या’ नेत्याची हकालपट्टी

वारंवार स्मरणपत्र देऊनही राजकीय द्वेषामुळे माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना सरकार काढत नाही, असा आरोपही रोहित पवारांनी केला आहे. त्यामुळे स्मरणशक्ती वाढावी म्हणून सरकारला च्यवनप्राश देण्याची आणि प्रसंगी माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसाठी उपोषण करण्याचीही माझी तयारी असल्याचेही रोहित पवारांनी म्हटले आहे.

मी आज ईडीला पत्र लिहून कारण… ‘त्या’ नोटीशीवर जयंत पाटील बोलले

महाविकास आघाडी सरकारने‎ कर्जत-जामखेड मतदारसंघात‎ ‘एमआयडीसी’ मंजूर केली होती. आता हा विषय अंतिम‎ टप्प्यात आहे. एमआयडीसीचा प्रश्न‎ मार्गी लावण्याचे आश्वासन‎ उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार‎ रोहित पवार यांनी दिला होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी एमआयडीसीत उद्योग येण्यासाठी रोहित पवार यांनी टीपीसीएल,‎ जिंदाल, एशियन पेंटस् कंपन्यांच्या‎ मालकांची भेट घेऊन त्यांच्याशी‎ चर्चा केली होती. परंतु सरकारकडून अद्यापही एमआयडीसीबाबत अधिसूचना काढण्यात आलेली नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube