मी आज ईडीला पत्र लिहून कारण… ‘त्या’ नोटीशीवर जयंत पाटील बोलले

मी आज ईडीला पत्र लिहून कारण… ‘त्या’ नोटीशीवर जयंत पाटील बोलले

Jayant Patil ED Notice : ईडीने (ED) पाठवलेल्या नोटीशीत कोणत्याही कारणाचा उल्लेख नसल्याने मी आज ईडीला पत्र लिहून प्रकरण काय आहे? याची विचारणा करणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितलं आहे. मुंबईत आज (१७ मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Marathi Theater Council नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रशांत दामलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

जयंत पाटील ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आले आहेत. ईडीकडून त्यांना आयएल आणि एफएलएस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. पहिल्यांदा नोटीस पाठवण्यात आल्यानंतर कौटुंबिक कारणास्तव त्यांनी चौकशीसाठी वेळ मागवून घेतला. मात्र नुकतेच ईडीने त्यांना नुकतेच दुसरे समन्स पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

Bhaskar Jadhav : पटोले, पाटील समोर एक बोलतात, अन् माघारी….

जयंत पाटील म्हणाले, ईडीने मला पाठवलेल्या नोटीशीत कोणतंही कारण दिलेलं नाही. मी नंतर इंटरनेटवर तपासल्यानंतर आयएल आणि एफएस प्रकरणी ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण आयएल आणि एफएसकडून मी कधीही कर्ज घेतलेलं नाही, कोणाला कर्जही दिलेलं नाही. तरीही मला नोटीस पाठवून बोलावलं आहे.

त्यामुळे नेमकं काय प्रकरण आहे याबाबत अद्याप अधिकृतपणे मला माहित नसून मी चौकशीला तिथे गेल्यानंतर समोर येणार आहे. त्याबद्दल मी आज ईडीला पत्र लिहून प्रकरण काय आहे, हे स्पष्ट करावं, अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, येत्या 22 तारखेला हजर राहण्याबाबतचे समन्स ईडीकडून बजावण्यात आले असून मी ईडीला चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करणार असल्याचं देखील पाटील यांनी स्पष्ट केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube