दुष्काळात तेराव्या महिन्यासारखंच ठाकरेंचं सरकार होतं, फडणवीसांचा हल्लाबोल…
Devendra Fadnvis Vs Udhav Thckeray : दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसंच कोरोनासोबतच उद्धव ठाकरेंचं(Udhav Thackeray) सरकार होतं, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईत आज भारतीय जनता पार्टी मोर्चा, आघाडीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात आधीच कोरोनाच संकट होतं. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसंत उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. त्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या न्यायहक्कासाठी संघर्ष केला. भाजपच्या कार्यकर्त्यांवर अनेक केसेस झाल्या तरी कार्यकर्त्यांनी कोणालाही न जुमानता आवाज उठवला. त्यानंतर पुन्हा एकदा आपलं सरकार महाराष्ट्रात आलं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Pakistan : इम्रान खानच्या घराला पुन्हा पोलिसांचा घेरा; 30 ते 40 दहशवादी असल्याचा संशय
तसेच महाराष्ट्रात सूड उगवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं असून मेट्रो ट्रेनचं काम थांबवून ठेवल्याने 10 हजार कोटींचं नूकसान यांच्यामुळेच झालं आहे. राजाच्या जीव पोपटात तर दुसरा पोपट मुंबई महापालिका आहे. उद्धव ठाकरेंनी 25 वर्ष मुंबईची तिजोरी लुटून मोठे झाले असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला आहे.
शिवसेना आपल्यासोबत निवडून आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मोठा फोटो अन् उद्धव ठाकरेंचा फोटो स्टॅम्प साईजचा लावून निवडून आली. तरीही त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खूपसला. त्यानंतर एकनाथ शिंदे आपल्यासोबत आले अन् सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं सरकारच कायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तरीही काही लोकं म्हणतात, आम्हीच जिंकलो.
CM शिंदेंनी ऐकली अभिनेत्रीची आर्त हाक; राधिका देशपांडेच्या मदतीला धावले प्रशासन
उद्धव ठाकरे राजा महाराजापेक्षा कमी नाहीत. एका राजाला एक पोपट आवडत होता. पोपट मेला त्यानंतर राजाला सांगेल कोण हा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यावेळी राजाला जो सांगेन त्याचा शिरच्छेद होणार होता. त्यानंतर पोपटाची विचारपूस सुरु होती, अगदी तशीच यांचीही अवस्था झाली आहे. त्यांना माहितीये पोपट मेलाय तरीही सांगतात 16 आमदार रद्द होणार आहे.
कोणीतरी उद्धवजींना हे समजून सांगितलं पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना दिला आहे. दीड वर्ष युसी पाठवली नाही म्हणून पैसे आले नाहीत अन् हे सांगतात मोदींनी पैसेच पाठवले नाहीत. त्यानंतर पंतप्रधान आवास योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1800 कोटी रुपये दिले आहेत.
दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे. अद्याप यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलेला नसून निर्णयाआधीच आमदार अपात्र होणार असल्याचा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला आहे.