Download App

संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंची सुरक्षा काढून टाकावी, राणेंचे फडणवीसांना पत्र

मुंबई : ठाकरे कुटुंबीय आणि राणे कुटुंबीय या दोन्ही राजकीय नेतेमंडळींमधील वाद हे सगळ्यांना माहितच आहे. दोघेही एकमेकांवर आरोप तसेच टीका करण्याची एक संधी देखील सोडत नाही. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे या दोघांना पोलीस संरक्षण देण्याची काही गरज दिसत नाही. त्यांच्यावर अशी कुठली ही परिस्थिती नाही म्हणून या दोघांचं पोलीस संरक्षण काढून टाकावं, असं या पत्रात म्हंटले आहे.

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष काही नवीन नाही. नुकतेच माजी खासदार निलेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत व ठाकरे यांचे पोलीस संरक्षण काढून घ्यावे याबाबत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

नेमकं काय म्हंटले आहे पत्रात ?
वरील विषयास अनुसरून संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आणि आदित्य ठाकरे हे विधानसभेचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांना पोलीस संरक्षण दिले आहे. पण माझ्या वाचण्यामध्ये आणि बघण्यामध्ये त्यांना पोलीस संरक्षण देण्याची काहीच गरज वाटत नाही. खासदार संजय राऊत हे स्वतःहून म्हणाले आहेत त्यांना पोलीस संरक्षणाची गरज नाही. आणि आदित्य ठाकरे हे फक्त साधे आमदार आहेत. त्यांना कुठलीही धमकी आलेली नाही किवा त्यांनी स्वतः तक्रार नोंदविलेली नाही. त्यांना कोणत्याही दहशतवाद्याची किवा गँगस्टरची धमकी नाही किवा त्यांनी असा कोणताही प्रश्न उचललेला नाही जेणेकरून कुठला वर्ग त्यांना मारण्याचा प्रयत्न करेल.

जसे इतर आमदार खासदार काम करतात तसेच हे त्यांच्या पदावर काम करत आहेत. त्यात वेगळेपण असे काहीच नाही. जर यांना संरक्षण मिळाले आणि यांच्यापेक्षा चांगले काम करणाऱ्यांना संरक्षण मिळाले नाही तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल. म्हणून पोलीस डिपार्टमेंटनी सुद्धा यांच्या जीवाला धोका आहे अस कुठे नोंदविलेले नाही किंवा त्याबद्दल चर्चाही नाही. म्हणून माझी विनंती आहे की यांचे पोलीस संरक्षण काढण्यात यावे कारण यांना संरक्षण देणे गरजेचे नाही. तेच पोलीस महाराष्ट्राच्या, मुंबईच्या इतर महत्वाच्या विषयांसाठी काम करू शकतात. त्यांना महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या कामांसाठी आपण कार्यरत करावे, ही विनंती.

मुख्यमंत्र्यांनी उडवा उडवीची उत्तरे न देता ठोस निर्णय घ्यावा; थोरातांची मागणी

दरम्यान निलेश राणे यांच्या या पत्रव्यव्हाराला आता खासदार संजय राऊत तसेच माजीमंत्री आदित्य ठाकरे काय उत्तर देणार याकडे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

Tags

follow us