भाजपचे ज्येष्ट नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचे निधन; वयाच्या 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचं निधन; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

Untitled Design (278)

Untitled Design (278)

Senior BJP leader and former cabinet minister Raj Purohit passes away : मुंबई भाजपच्या राजकारणातील अभ्यासू, स्पष्टवक्ते आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असलेले माजी कॅबिनेट मंत्री राज पुरोहित यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय जीवनातून एक अनुभवी, निष्ठावान आणि दीर्घकाळ जनतेशी नाळ जोडून असलेले नेतृत्व हरपले आहे.

राज पुरोहित यांना प्रकृतीच्या तक्रारींमुळे 15 जानेवारी रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र उपचारांची अखेरची लढाई अपयशी ठरली आणि आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजप कार्यकर्ते, समर्थक आणि सर्वपक्षीय नेत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवणार; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची घोषणा

मुंबईच्या राजकारणात पुरोहित यांनी जवळपास अडीच दशकांचा ठसा उमटवला. 1990 पासून त्यांनी मुंबादेवी आणि कुलाबा मतदारसंघात सातत्याने जनतेचे प्रतिनिधित्व केले. 1990, 1995, 1999 आणि 2004 अशा चार वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. केवळ आमदार म्हणूनच नव्हे, तर मुंबईत भाजप संघटना मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पुरोहित कुटुंबाची राजकीय परंपरा पुढे नेत भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित हे त्यांचे पुत्र आहेत. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांपूर्वीच झालेल्या महापालिका निवडणुकीत आकाश पुरोहित यांनी विजय मिळवला होता. अशा आनंदाच्या क्षणी राज पुरोहित यांच्या निधनाने कुटुंबावर आणि समर्थकांवर शोककळा पसरली आहे. राज पुरोहित यांचे कार्य, त्यांची आक्रमक भूमिका आणि मुंबईच्या राजकारणातील योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Exit mobile version