दु:खद बातमी! ज्येष्ठ काँग्रेस नेत्या अन् माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या.

News Photo   2025 12 20T174153.205

दु:खद बातमी! ज्येष्ठ काँग्रेस नेत्या अन् माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन

एक दु:खद बातमी समोर आली आहे. (Congress) ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झालं आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या शालिनीताई पाटील या पत्नी होत्या. त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. आज त्यांनी मुंबईत माहिम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहेत. शालिनीताई यांनी वसंतदादांना खबीर साथ दिली होती.

राजकारणातील वाघीण म्हणून उल्लेख

शालिनीताई पाटील या मंत्री आणि आमदार म्हणून एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मराठा आरक्षणासाठीही आवाज उठवला होता, मात्र त्यांना नेत्यांची आणि जनतेची साथ मिळाली नव्हती. साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी शालिनीताईंना मातेसमान दर्जा देत सदैव साथ दिली. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा केला होता.

वसंतदादांची आणि शालिनीताई यांची पहिली भेट

एप्रिल १९५७ सांगली जिल्हा लोकल बोर्ड निवडणुकीत बोरगाव मतदारसंघातून शालिनीताई उभा राहिल्या होत्या. हूशार असणाऱ्या शालिनीताईंना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. तर संपुर्ण सांगली जिल्ह्याच्या लोकल बोर्ड निवडणुकांची जबाबदारी वसंतदादा पाटील यांच्याकडे होती.

शालिनीताई तेव्हा कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून BA ची परिक्षा देवून आल्या होत्या. इकडे येताच त्या बोरगाव मतदारसंघातून उभा राहिल्या. त्यावेळी शालिनीताईंच लग्न झालं होतं. वसंतदादांच्या पत्नी मालतीताईं पद्माळे येथे रहायला असत. मालतीताईंची तब्येत बिघडलेली असल्याने त्या अंथरुणावरच असत. या पार्श्वभूमीवर निवडणुकिच्या प्रचाराचानिमित्ताने इस्लामपूर येथील दादासाहेब मंत्री यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. याच भेटीत शालिनीताईं पाटील आणि वसंतदादा पाटील यांची पहिली भेट झाली.

बांगलादेशातील हिंसाचार चिघळला; वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग, 27 वर्षात पहिल्यांदा पेपर छापला नाही

त्या वेळी ते वयाच्या पन्नाशीच्या आसपास होते. पोटाचा मोठा घेर सोडला तर त्यांची प्रकृती दणकट दिसत होती. चेहरा आकर्षक आणि देखणा होता. मागे विंचरलेले कुरळे केस अशा थाटातला तो चेहरा प्रसिद्ध अभिनेते अशोककुमार यांच्यासारखा दिसत होता. शालिनीताई आणि वसंतदादांची हि पहिली भेट. शालिनीताई या निवडणुकीत निवडून आल्या. त्याच वर्षी त्या BA च्या परिक्षा देखील पास झाल्या. लोकल बोर्डावर निवडुन आल्यामुळे वसंतदादा आणि शालिनीताईंचा संपर्क येवू लागला. पुढे १९६४ साली शालिनीताई एकट्या पडल्या. त्यांची मुलं लहान होती. पैसा अडका वगैरे सारख्या गोष्टी सोबत नव्हत्या. त्यांनी वकिलीच शिक्षण घेतलं होतं. पण, त्यावर लगेच प्रॅक्टिस सुरू करुन पैसा उभा करण त्यांना शक्य वाटत नव्हतं.

त्या काळात मालतीताईंची देखील तब्येत बिघडलेली असायची. मालतीताईं पद्माळे येथे रहात. फिरतीवर असताना जिथे मिळेल ते खायचं असाच त्यांचा दिवस जायचा. अशा वेळी शालिनीताईंसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव खुद्द वसंतदादांनी समोर ठेवला आणि शालिनीताईंनी तो तात्काळ मान्य केला. लग्नाचा प्रस्ताव मान्य होताच वसंतदादा आणि शालिनीताईंच लग्न मुंबईच्या पटेल चेंबर्स येथील निवासस्थानी पार पडलं. दोघांचा वैदिक पद्धतीने विवाह झाला व या विवाहास आठ ते दहाजण उपस्थित होते.

वसंतदादांच्या दूसऱ्या विवाहाची बातमी सांगली जिल्ह्यात धडकली आणि लोकांचा उद्रेक झाला. शालिनीताई ९६ कुळी मराठा आणि वसंतदादा पाटील देखील ९६ कुळी मराठा. मराठा समाजात असा दोघांचाही दुसरा विवाह त्या काळात मान्य होणार नाही अस दादांच्या जवळच्या व्यक्तिंच म्हणणं होतं. त्यातही शालिनीताईंचा दूसरा विवाह मान्य होणारच नाही, या विवाहामुळे वसंतदादांची राजकिय कारकिर्द संपुष्टात येवू शकते अस आप्तेष्टांच म्हणणं होतं. तरिदेखील वसंतदादांनी हा धाडसी निर्णय घेतला होता.

Exit mobile version