Shahu Maharaj Chhatrapati : विशाळगडावरील अतिक्रमण (Vishalgad) हटवण्यासाठी संभाजीराजेंच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक स्वरुप प्राप्त झालं. हिंदू संघटनांनी दगडफेक, जाळपोळ करून घरांचे आणि वाहनांचे नुकसान केले. दरम्यान, या हिंसाचाराचा खासदार शाहू महाराज (MP Shahu Maharaj) यांनी तीव्र शब्दात निषेध केला. हा हिंसाचार वेदनादायी आहे असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली असती तर ही घटना टळली असती, असं ते म्हणाले.
विशाळगड येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. शांति आणि न्याय यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. #Kolhapur pic.twitter.com/TexoKFVDyf
— Office of Shahu Chhatrapati (@ShahuChhatrpati) July 15, 2024
Sakhi Gokhale चा गुलाबी साडीमध्ये गोड अंदाज, पाहा फोटो
शाहू महाराजांनी या हिंसाचाराच्या घटनेनंतर एक पत्र जारी केलं. त्यात ते म्हणाले की, विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार प्रंचड वेदनादायी असून आम्ही त्याचा निषेध करतो. राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घटना होते, हे अत्यंत क्लेशदायक आहे. या संदर्भात प्रशासनाने विशाळगड प्रश्न गांभीर्याने घेऊन माजी खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घडवून आणावी, अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांना घटनेपूर्वी दिल्या होत्या.
Laxman Hake : … म्हणून शरद पवार भुजबळांची भेट, लक्ष्मण हाकेंचा मोठा खुलासा
जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश
पुढं लिहिलं की, राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली. हे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश आहे. अतिक्रमण काढण्याचे आदेश राज्य सरकारने रविवारी जिल्हा प्रशासनाला दिले असते तर ही घटना घडली नसती. या हिंसाचाराबद्दल संबंधित लोकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी छत्रपती शाहू महाराज यांनी केली आहे.
तातडीन नुकसान भरपाई द्या..
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या प्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केलेआणि सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली. मात्र त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर झालेल्या हिंसाचाराचा आम्ही तीव्र निषेध करतो. हिंसाचारात ज्या निष्पाण लोकांचे नुकसान झाले, त्यांना सरकारने तातडीन भरपाई द्यावी, अशी मागणीही शाहू महाराजांनी केली.