Download App

‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण

Shambhuraj Desai : शिंदेंच्या शिवसेनेने काल वर्तमानपत्रांत एक जाहिरात (Shivsena Advertisement) दिली होती. या जाहिरातीवरून काल दिवसभर राजकारण तापले होते. या जाहिरातीतील चूक लक्षात आल्याने मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सपशेल माघार घेत दुसरी जाहिरात दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही फोटो आहे. शिंदे गटाकडून आता या प्रकारावर सारवासारव केली जात आहे. आता या प्रकरणी राज्य उत्पादन शु्ल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी आज लेट्सअप मराठी प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी त्यांनी जाहिरात वादावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ही चूक आमच्याकडून झालेली नव्हती. कालही मी बोललो. काल वर्तमानपत्रात जी जाहिरात आली होती ती आमच्या पक्षाकडून दिली गेली नव्हती. त्रयस्थ व्यक्तीने आम्हाला ज्याची माहिती नाही अशा व्यक्तीने दिली होती. आम्ही सुद्धा त्याची माहिती घेत आहोत की जाहिरात कुणी दिली.

Shivsena Advertisement : अखेर शिंदे भाजपसमोर नमलेच! आजच्या जाहिरातीत शिंदे-फडणवीसांना जनतेचा आशिर्वाद…

तसे पाहिले तर शिवसेना पक्षाचा या जाहिरातीशी काहीच संबंध नव्हता. पण कालच्या जाहिरातीनं जो थोडा फार गैरसमज झाल होता. तो गैरसमज राहू नये यासाठी आजची जाहिरात अधिकृतपणे पक्षातर्फे देण्यात आली आहे. त्यामध्ये शिवसेना, भाजप व मित्रपक्ष यांना 50 टक्क्यांपेक्षा पसंती आहे त्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे, असे देसाई म्हणाले.

माहिती घेण्याचे काम सुरू

ही जाहिरात कुणी दिली याची माहिती आम्ही घेत आहोत. काल आम्ही चर्चा केली. जाहिरात कुणी दिली. त्यामागे त्याचा काय हेतू आहे याची माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी आमच्या यंत्रणेकडून माहिती घेण्याचे काम सुरू असून लवकरच ती माहिती आमच्यापर्यंत येईल.

राजकारण करू नका

उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडूनच अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या कानाला थोडा त्रास झाल्यामुळे त्यांना हवाई प्रवास तीन दिवस पूर्ण बंद करण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे याला राजकीय वळण कुणीही देऊ नये, असा इशारा मंत्री देसाई यांनी विरोधकांना दिला.

Letsupp Special : लोकसभेच्या ‘त्या’ २१ जागा… ज्यांच्यासाठी काँग्रेस ‘मविआ’मध्ये भिडणार!

फडणवीस नक्कीच समजून घेतील.

काल आम्ही बराच वेळ एकत्र होतो. त्यावेळी फडणवीस यांच्या वागण्यात आणि बोलण्यात तसे कुठेच जाणवले नाही. त्यामुळे फडणवीस नक्कीच समजून घेतील. कारण, त्यांना सुद्धा या गोष्टीची कल्पना आहे की ही जाहिरात आम्ही पक्षाकडून दिली गेली नाही. त्यामुळे निश्चितपणे ते समजून घेतील. युती आम्हाला टिकवायची आहे. त्यामुळे अशा छोट्या गोष्टींमुळे महायुतीत कोणताही बेबनाव येणार नाही.

दिल्लीश्वरांनी दिली प्यार की झप्पी

शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला जात असला तरी विरोधक मात्र दाद द्यायला तयार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आज पुन्हा जोरदार हल्ला चढविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (mahesh Tapase) यांनी एका वाक्याचे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शिंदे सेनेवर खोचक शब्दांत टीका केली आहे. ‘शिंदे सेनेची आजची जाहिरात पाहिल्यानंतर दिल्लीश्वरांनी नक्कीच त्यांना प्यार की झप्पी दिल्याचे जाणवते.’ असे ट्विट तपासे यांनी केले आहे.

 

Tags

follow us