Letsupp Special : लोकसभेच्या ‘त्या’ २१ जागा… ज्यांच्यासाठी काँग्रेस ‘मविआ’मध्ये भिडणार!

Letsupp Special : लोकसभेच्या ‘त्या’ २१ जागा… ज्यांच्यासाठी काँग्रेस ‘मविआ’मध्ये भिडणार!

Congress : मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता ९ महिन्यांपेक्षा कमी दिवस बाकी आहेत. अशात भाजप, शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) सर्वच राजकीय पक्षांची लगबगीने तयारी सुरु आहे. बैठका, रणनीती, मतदारसंघ अभ्यास, उमेदवार चाचपणी अशा गोष्टींवर सध्या भर देण्यात येत आहे. मे महिन्यात लोकसभेची मुदत संपत असल्याने मार्च महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. (Congress party and Nana Patole plan for Lok Sabha in Maharashtra)

याच पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसची दोन दिवसांची जिल्हावार कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. यानंतर राज्य काँग्रेसकडून केंद्रीय कार्य समितीला महाराष्ट्रातील परिस्थितीचा लेखाजोखा पाठवण्यात आला आहे. यात विजयाची हमी असलेले २१ मतदारसंघ काँग्रेसने निश्चित केले असल्याचे समजते. या २१ मतदारसंघांवर काँग्रेस जागा वाटपासंदर्भातील महाविकास आघाडीच्या बैठकीत दावा करणार असून प्रसंगी वादही घालण्याची शक्यता आहे.

Shivsena Advertisement : अखेर शिंदे भाजपसमोर नमलेच! आजच्या जाहिरातीत शिंदे-फडणवीसांना जनतेचा आशिर्वाद…

काँग्रेसच्या या अहवालानुसार विदर्भातील जवळपास सर्व मतदारसंघांत परिस्थिती अत्यंत उत्तम आहे. गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा इत्यादी मतदारसंघांत वातावरण चांगले आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतरही चंद्रपूरमध्ये पुन्हा विजय मिळविता येईल, याशिवाय नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना धक्का देता येईल, असे दावे कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहेत. या सोबतच मराठवाडा, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांची समावेश आहे,

दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विजयाची हमी असलेल्या मतदारसंघांमध्ये जे यापूर्वी काँग्रेस आघाडीमध्ये लढत आहे, अशा मतदारसंघांचा समावेश आहे. याशिवाय काही मतदारसंघ हे राष्ट्रवादीचे तर काही मतदारसंघ ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावेळी जोरदार खडाजंगी होणार या शंकाच नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर राज्यात काँग्रेसबद्दलचे लोकांचे मत बदलत आहे, असेही दावे या बैठकीत करण्यात आले.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक होताच तामिळनाडूचे मंत्री ढसाढसा रडले, पाहा व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड, हिंगोली आणि लातूर या जागा काँग्रेसने घ्याव्यात. तसेच धुळे, नंदूरबार आणि शिर्डी या जागांवर काँग्रेसकडे तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे हे मतदारसंघ सोडू नये. कोल्हापूर, सांगली या मतदारसंघांमध्ये काँग्रेसची ताकद आहे. तसेच कसबापेठ पोटनिवडणुकीनंतर पुणे मतदारसंघही दृष्टीक्षेपात आला आहे. भिवंडी हा अल्पसंख्यांक मतदारसंघ, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम या मतदारसंघांवरही काँग्रेस जोर लावण्याच्या विचारात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube