Download App

राज्यात खंडणी प्रकरणं अन् दहशतीचं वातावरण, शरद पवारांचा थेट CM फडणवीसांना फोन

प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी (मुंबई प्रतिनिधी)

Sharad Pawar Call CM Devendra Fadnavis On Extortion : राज्यात खंडणीचा मुद्दा दिवसेंदिवस तीव्र होतोय. यासंदर्भात शरद पवारांनी (Sharad Pawar) मुख्यमंत्र्‍यांशी फोनवरून संवाद साधल्याचं समोर आलंय. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) याच्यांसोबत फोनवर संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील पवनचक्की मालकांना खंडणीबाबतचा (Extortion Issue) त्रासाचा मुद्दा उपस्थित केला.

मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बोलताना खंडणीचे प्रकार वारंवार होत असल्याचा मुद्दा पवारांनी उपस्थित केला होता. पवारांनी सातारा, पाटण, कोल्हापूर, बीड सांगली या परिसराचा उल्लेख (Extortion Issue Of windmill owners) केलाय. दहशत मोडून काढण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आश्वासन दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे.

राज्यातील राष्ट्रीय ज्यूदोपटूंच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार्य करू; पुनीत बालन ग्रुपने दिलं आश्वासन

महिनाभरापूर्वी काही गुंडांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केली. या घटनेला भला मोठा काळ उलटून गेला तरी देशमुख यांचे मारेकरी मोकाटच आहे. त्यामुळे, या घटनेला मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे दिसते. बीड- परळी भागात यापूर्वी देखील अशा धक्कादायक अनेक घटना घडल्यात. त्यामुळे या घटनेची दखल घेण्याची मागणी राज्यभरातील लोकप्रतिनिधींकडून मागणी होतेय. त्यासाठी अनेक मंत्री, नेतेमंडळी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहेत.

भाजपकडून लोकशाही हायजॅक; निवडणूक आयोग झालं ताटाखालचं मांजर; राऊतांचा थेट घणाघात

त्यामुळे या गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या आणि इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्‍यांकडे दोन दिवसांपूर्वी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आलीय. मस्साजोग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्ष अध्यक्ष शरद पवार यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय.

 

follow us