दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शरद पवारांची मोठी एन्ट्री; सरकारच्या घोषणांनंतर बैठकीत घेतला मोठा निर्णय

Sharad Pawar : दुष्काळी मदत अपुरी असल्याचं सांगत शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी सरकारनं तातडीनं नव्या उपाययोजनांबद्दल केली सूचना.

News Photo   2026 09 28T150504.812

Sharad Pawar on drought relief measures

राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर (Drought) झाल्यानंतर शेतकरी आणि ग्रामीण भागातील संकट अधिक गंभीर झालं आहे. पावसाअभावी खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं असून, मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सरकारने दुष्काळग्रस्त भागांसाठी काही सवलती आणि उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी त्यातून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक आधार मिळणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मांडण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी सरकारनं सध्याच्या मदतीच्या पलीकडे जाऊन नव्या आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठीच्या उपायांवर चर्चा झाली. याआधीच शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून दुष्काळग्रस्तांसाठी 17 मागण्या मांडल्या आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत, शेतमजुरांना 25 हजार रुपयांची मदत, शेतीपंपांच्या वीजबिलात सवलत, जमीन महसूल माफी आणि कर्जमाफीसह विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत. दुष्काळग्रस्त कुटुंबांना 25 किलो मोफत धान्य देण्याची आणि पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करण्याची मागणीही त्यांच्या पत्रातून करण्यात आली आहे.

Sharad Pawar On NDA : तुम्ही भूमिका बदलणार अन् एनडीएत जाणार? शरद पवार म्हणाले

सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या उपाययोजना या सध्याच्या संकटाच्या तुलनेत अपुऱ्या आहेत, असं शरद पवार यांनी बैठकीत सांगितलं. शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत असून त्याला केवळ सवलती नव्हे तर थेट आणि भक्कम आर्थिक मदतीची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्यास त्याचाही विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीवर चर्चा करून पुढील मदतीचे निर्णय घेण्यासाठी विधानसभेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

दरम्यान, दुष्काळाची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पुढील तीन दिवस राज्यातील विविध भागांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात शेतजमिनींची पाहणी करून पिकांचं नेमकं किती नुकसान झालं आहे, शेतकरी आणि शेतमजुरांसमोर कोणत्या अडचणी आहेत, याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर सरकारकडे आणखी ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात येणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्तांना दसरा आणि दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Exit mobile version