Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आरक्षण 50 टक्क्यांवरुन 75 टक्क्यांपर्यंत जाऊ द्या, ज्याला मिळाले नाही त्याचा 25 टक्क्यांमध्ये समावेश करता येतील असं मत शरद पवार यांनी केलं. (Sharad Pawar) यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा, आम्ही त्याबाबाबत पाठींबा देऊ असंही शरद पवार म्हणाले आहेत.
ही लोकांची भावना
मराठा आरक्षण मिळावं ही लोकांची भावना असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. इतरांचे जे आरक्षण आहे त्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असंही पवार म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टिका केली. त्यांना एकही जागा निवडूण आणता आली नाही. ते लोक माझ्यावर बोलतात, हे प्रसिद्धीसाठी बोलत असतात असं म्हणत शरद पवारांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला.
मराठीला अभिजात दर्जा म्हणजे नक्की काय? कोणते फायदे मिळणार अन् निकष काय
तुम्हाला एवढी एनर्जी येते कुठून? असा प्रश्न देखील प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांनी विचारला. यावेळी शरद पवार म्हणाले की, जसे जसे वय वाढते तस तशी एनर्जी वाढते. यावेळी बोलतना शरद पवार यांनी नितीन गडकरी यांच्याबबातही प्रतिक्रिया दिली. नितीन गडकरी यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना जे योग्य वाटतं ते भले सरकारच्या विरोधात असतील तरी बोलतात असंही शरद पवार म्हणाले. एमआयएमने दिलेल्या प्रस्तावाबाबत देखील शरद पवारांना विचारण्यात आले, यावेळी पवार म्हणाले की, कुणी काय प्रस्ताव दिलाय हे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पाहतात, मला याबाबत काही कल्पना नसल्याचं पवार म्हणाले.
यापैकी 14 ठिकाणी पराभव झाला
अमित शाहा यांचा अलीकडे महाराष्ट्रात मुक्काम जास्त असतो याबाबत प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांनी विचारलं. यावेळी शरद पवार म्हणाले की, देशाचे गृहमंत्री भाषणात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर लक्ष ठेवा असं बोलतात. लोकसभा निवडणुकीत अमित शाह यांच्या 18 ठिकाणी सभा झाल्या होत्या. यामध्ये 14 ठिकाणी त्यांचा पराभव झाल्याचं शरद पवार म्हणाले. त्यामुळं यावेळी देखील त्यांनी जास्त सभा घ्याव्यात असा टोला शरद पवार यांनी लगावला.