“२०१९ मध्ये थांबलो पण, यंदा पुरंदर लढणारच!” शरद पवारांच्या शिलेदाराचा पक्का निर्धार

“२०१९ मध्ये थांबलो पण, यंदा पुरंदर लढणारच!” शरद पवारांच्या शिलेदाराचा पक्का निर्धार

Sambhaji Zende on Maharashtra Elections : ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार साहेबांबरोबर (Sharad Pawar) राहायचं हे पहिल्याच दिवशी ठरवलं होतं. याबाबतीत मी अजितदादांनाही अंधारात ठेवलं नाही. शरद पवारांच्या शब्दाला मान देणारच पण माझा निर्णय पक्का आहे मी निवडणूक लढवणार. यंदा थांबण्याची माझी आजिबात तयारी नाही’, अशा शब्दांत माजी आयएएस अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संभाजी झेंडे (Sambhaji Zende) यांनी व्यक्त केला.

राज्यात विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Elections) धामधूम सुरू आहे. इच्छुकांकडून चाचपणी सुरू आहे. यामध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडणूक (Purandar Constituency) लढण्याची तयारी संभाजी झेंडे यांनी केली आहे. यानिमित्त त्यांनी लेट्सअप मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणुकीसह राजकीय, प्रशासकीय मुद्द्यांवर अगदी बेधडक मते व्यक्त केली.

ज्या पक्षाचा आमदार आहे तो पक्ष त्या पक्षाकडे जाणार असं जागावाटपाचं सूत्र दिसतंय अशा वेळी तुमची भूमिका काय असणार? असा प्रश्न विचारला असता झेंडे म्हणाले, ‘पहिल्यांदा २००४ मध्ये ज्यावेळी जागावाटप झालं त्यावेळी पुरंदरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आलेली होती. येथून अशोकराव टेकवडे विजयी सुद्धा झाले. यानंतर २००९ ला याच पक्षाचे डॉ. दिगंबर दुर्गाडे उभे राहिले. हा एक इतिहासाचा भाग आहे म्हणून सांगावे लागते की ते पराभूत झाले आणि शिवसेनेचा (Shivsena) उदय झाला. विजय शिवतारे विजयी झाले. २०१४ आणि २०१९ ला कुठल्याही पक्षाची साथ नसताना सुप्रिया सुळेंना ७२ हजार (Supriya Sule) मतं पडली. त्यामुळे तालुका हा राष्ट्रवादीवर प्रेम करणारा तालुका आहे.’

येवला मतदारसंघात शरद पवारांचा डाव, छगन भुजबळांविरोधात देणार ‘या’ उमेदवाराला संधी

आता मी निवडणूक लढणारच

‘पुढे २०१९ मध्ये एक निर्णय घेण्यात आला. आपण एकत्रितरित्या लढलं तर निवडणूक जिंकू शकतो. म्हणून मलाही फॉर्म भरायला सांगण्यात आलेलं होतं. फॉर्म तयारीत होता सबमिट करायचा राहिला होता. त्यानंतर एक दोन तीन दिवस अगोदर शेवटचा जो दिवस होता चार ऑक्टोबर २०१९ त्याचे दोन दिवस अगोदर मला सांगण्यात आलं, की तुम्हाला थांबावं लागेल तुमचा पुढच्या वेळी विचार करू. परंतु सध्या तरी तुम्ही थांबा. मतांचं विभाजन होऊन तिसऱ्याचा फायदा होण्यापेक्षा त्यावेळी मला थांबवण्यात आलं. आता यावेळी मात्र थांबण्याची अजिबात तयारी नाही का काम करत आलेलो आहे.’

विजय शिवतारे ज्यावेळी शरद पवार, अजित पवारांच्या विरोधात बोलतात त्याचवेळी विजय शिवतारे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसतात हे पुरंदरच्या जनतेला आवडलं आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात झेंडे म्हणाले, ‘विजय शिवतारे यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका लोकांना पटलेली नाही. मी त्यांच्यावर काही टीका करत नाही पण त्यांची भूमिका लोकांना पटली नव्हती हे लोकांनी दाखवून दिलं आहे.’

राजकीय टीका तुम्ही टाळताय का? असाही सवाल विचारण्यात आला. त्यावर ‘राजकीय टीका मी कुणावरच करत नाही मुद्द्यांवर मात्र मी भरपूर टीका करतो. कारण माझं असं मानणं आहे की राजकारण हे व्यक्तिद्वेषाचं नसावं. राजकारणात व्यक्तिद्वेषाला जागाच नाही. विचारसरणी म्हणून पक्ष वेगळा असू शकतो. पण त्यात येतात ते सगळे समाजकारणासाठीच. त्यामुळे कुणाचा वैयक्तिक द्वेष माझ्या डिक्शनरीतच नाही’, असे संभाजी झेंडे यांनी स्पष्ट केले.

“अजित पवार महायुतीतून बाहेर येतील अन्..” बच्चू कडूंच्या वक्तव्याने खळबळ!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube