Download App

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान काय? टीकेवर उत्तर देत पवारांचा खोचक सवाल

Sharad Pawar यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दोन वाक्यात उत्तर दिलं आहे.

Sharad Pawar Criticize Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha elections) पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान होणार आहे. या दरम्यान राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी दोन वाक्यात उत्तर दिलं आहे. पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणार राज ठाकरेंचं स्थान काय? हे माहिती नाही. पवार हे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

Box Office: श्रीकांतची सहाव्या दिवशी बंपर सुरुवात; मोडला ’12वी फेल’च्या कमाईचा रेकॉर्ड

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणार राज ठाकरेंचं स्थान काय? हे माहिती नाही. हल्ली ते नाशिक या त्यांच्या बालेकिल्ल्यातही दिसत नाहीत. तर राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये महायुतीसाठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेतली होती. या सभेत त्यांनी शरद पवार यांच्यावर अजित पवारांनी केलेल्या बंडावरून टीका केली होती. त्यावर आता शरद पवार यांनी राज यांनी त्यांचं स्थान दाखवत उत्तर दिलं आहे.

मुंबईसाठी भाजपची राज ठाकरेंकडे फिल्डिंग…

दरम्यान राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता पाचव्या टप्प्यासाठी घौडदौड सुरु आहे. पाचव्या टप्प्यांत सर्वच पक्षांकडून मुंबईसाठी फिल्डींग लावण्यात येत आहे. मुंबईत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

रोड शो फक्त गुजराती परिसरात, अन्य भागात मोदी का गेले नाही? शरद पवारांची टीका

भाजपकडून मुंबईसाठी राज ठाकरे यांना मैदानात उतरवणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचं अनुषंगाने बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही मात्र पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मुंबईत रणनीती आखण्यासाठीच बावनकुळेंनी राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे.

follow us

वेब स्टोरीज