मस्जिदीवरील भोंग्यांवरुन Praveen Togadiya यांनी Raj Thackeray यांना डिवचले
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया ( Praveen Togadiya ) यांनी मस्जिदीवरील भोंग्यांवरुन सरकारवर टीका केली आहे. रात्री 10 वाजेपासून सूर्य उगवेपर्यंत मस्जिदीवर लाऊडस्पीकर वाजायला नको, असे सर्वोच्च न्यायालयाचे ( Supreme Court ) आदेश आहेत. त्याचं पालन व्हायला हवं. आपले काही बंधू उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन करत होते. आता या सरकारमध्येही त्यांनी आंदोलन करून मस्जिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन करावं, असे म्हणत प्रवीण तोगडिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. तोगडिया हे जालना शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहरातील राममंदिरात आरती केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
राजकारणात आज एकमेकांना विरोध करणारे उद्या एका ताटात जेवतील, त्यांचा विचार आणि चिंता करु नका, स्वस्तात शिक्षण शेतकऱ्यांच्या मालाला भाव कसा मिळेल यावर चर्चा करा असे सांगत त्यांनी ठाकरे शिंदे आणि भाजपवरील वादावर भाष्य केले आहे. माझी लढाई भाजप शिंदे सरकार विरोधात नाही, तर माझी लढाई ही शेतकऱ्यांसाठी आहे. एकनाथ शिंदेंनी कांद्याला चांगला भाव द्यावा, मुख्यमंत्री भाव देणार नाही तर मग शेतकऱ्यांच्या कांद्याला कोण भाव देईल, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
तसेच यावेळी बोलताना त्यांनी इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. लोकसंख्या नियंत्रण कायदा नाही बनला तर तयार होत असलेलं राममंदिर 50 वर्षानंतर देखील सुरक्षित राहणार नाही, असे तोगडिया म्हणाले आहेत. सध्या पाकिस्तानात आर्थिक दिवाळखोरी असली तरी पाकिस्तानला भारताने मदत करता कामा नये. जो मदतीसाठी पुढे येईल त्यांनाही मी विरोध करीन, असं सांगत पाकिस्तान पृथ्वीच्या नकाशावर देखील असता कामा नये, असे ते म्हणाले. तसेच मिसाईल आणि तोफ घेऊन पुढे जा आणि अखंड हिंदू राष्ट्र बनवा, असं सांगत दिवाळखोरीत सापडलेल्या पाकिस्तानवर हल्ला करण्याची नामी संधी भारताला उपलब्ध झाल्याचे तोगडिया म्हणाले आहेत.
(पहाटेच्या शपथविधीवरील प्रतिक्रियेनंतर आमदार Anna Bansode फोनच उचलेनात…)