Download App

मराठा-ओबीसी आमनेसामने; समाजात कुणी फूट पाडली? शरद पवारांचं ‘या संघर्षावर’ सडेतोड भाष्य

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा ओबीसी आरक्षण संघर्षावर शरद पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. त्यांनी आपलं मत मांडलं आहे.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar on Reservation :  आत्ताची जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्याबद्दल अस्वस्थता वाटते का ? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, आत्ताची जी स्थिती आहे विशेषत: काही जिल्ह्यांची. त्यामध्ये जालना, बीड परभणी या जिल्ह्यांमध्ये वातावरण अत्यंत अस्वस्थ आहे. लोकसभेच अधिवेशन संपल्यावर मी त्या लोकांशी जाऊन भेटणार आहे. (Sharad Pawar) त्यांना बोलणार आहे असं पवार यावेळी म्हणाले. ते एबीपी माझाच्या महामाझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.

सुप्रिया सुळेंबाबत अभिमानाचा क्षण कोणता? जावई कुणी शोधला? शरद पवारांची अराजकीय उत्तर

लोकांची तयारी आहे

महाराष्ट्रात जो काही वाढता भ्रष्टाचार आहे, छोट्या छोट्या गोष्टींवरून जी अस्ताव्यस्तता झाली आहे त्यावर आपल्याला काय वाटत अस विचारल्यावर पवार म्हणाले, यातील कारण काय आहेत हे नाही सांगता येणार. पण, ज्यांच्यावर जबाबदारी आहे, ज्यांच्यावर बांधिलकी आहे ते कमी पडले असं वाटतय. तसंच, हे जरी खरं असल तरी महाराष्ट्रामध्ये फार मोठा वर्ग असा आहे जो या सर्व गोष्टींना यत्किंचितही समर्थन देत नाही असंही पवार यावेळी म्हणाले आहेत. हे दुरुस्त झालं पाहिजे त्यासाठी कष्ट करण्याचीही या लोकांची तयारी आहे, ही जमेची बाजू असंही ते म्हणाले आहेत.

काम करावं लागेल

तुमची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त संवाद ठेवला पाहिजे. आज संवाद संपलेला आहे. सार्वजनिक किंवा राजकीय जीवनात जेव्हा संवाद थांबतो तेव्हा चुकीच्या समजुती वाढत जात असतात. त्यामुळे संवाद जास्त गरजेचा आहे आणि त्यासाठी आमच्यासारख्या लोकांनी लक्ष द्यायला हव असंही पवार यावेळी म्हणाले आहेत. तसंच, मी कधीही महाराष्ट्रत असं ऐकलं नाही की एका समाजाच हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथे चहा घ्यायलाही जात नाहीत. हे भयावह चित्र आहे. ते बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढला पाहिजे, आणि अशा प्रसंगात आमच्यासारख्या लोकांनी जीव ओतून काम केलं पाहिजे असंही पवार यावेळी म्हणाले.

केंद्राचं लक्ष ? Maratha Reservation: शरद पवार ते एकनाथ शिंदे; 44 वर्षांत मराठा आरक्षणाचे काय झाले ?

तुमची भूमिका काय यावर पवार म्हणाले, यामध्ये असं आहे की पहिल्यांदाच दुर्दैवाने दोन वेगळे वर्ग पडले आहेत. आणि त्या वर्गांना कुणी काही तरी सांगितलं आहे. तसंच, आजचे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी वेगळ्या दोन भूमिका घेतल्या आहेत असा थेट आरोपच पवारांनी यावेळी केला आहे. यामध्ये एका गटाने मराठा आंदोलकांची बाजू घेतली तर दुसऱ्या गटाने ओबीसी आंदोलकांची बाजू घेतली आहे. हे योग्य नाही. आपण समंजस्य कस निर्माण करू शकतो यावर लक्ष देण गरजेचं आहे असंही पवार म्हणाले आहेत. आणि संवाद वाढवण गरजेच आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, केंद्राने यामध्ये लक्ष गातलं का या प्रश्नावर पवार म्हणाले अजिबात नाही केंद्राने यामध्ये लक्षही घातलं नाही असं पवार म्हणाले आहेत.

follow us