सुप्रिया सुळेंबाबत अभिमानाचा क्षण कोणता? जावई कुणी शोधला? शरद पवारांची अ’राजकीय उत्तर
Sharad Pawar Supriya Sule : लहान असताना तुम्हाला शरद पवारांकडून राजकारणाचं बाळकडू मिळालं का? या प्रश्नावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाले मी दोन टोकाच्या परिस्थितीमध्ये वाढले आहे. कारण माझ्या आईला राजकारण अजिबातच आवडत नाही आणि वडिलांना म्हणजे शरद पवारांना (Sharad Pawar) राजकारण सोडून काहिच आवडत नाही. त्यामुळे अशा दोन टोकाच्या परिस्थितीमध्ये माझं बालपण गेलेलं आहे. तसंच, आम्ही घरी असताना आमच्यात राजकारणावर काहीच चर्चा होत नाही. कुणी काय वाचलं असेल तर त्यावर बोलतो किंवा मी बोलत असते पवार साहेब ऐकत असतात असं (Supriya Sule ) सुप्रिया सुळे म्हणाल्या.
माझी लाडकी बहिण निवडणुकीपुरती.. एक, दोन हप्तेच मिळणार; शरद पवारांचं खोचक भाष्य
ती उत्सुकता नाही
पेपप वाचण्याच्या मुद्यावरू तुम्ही सामना वाचता का असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणारे आम्ही सगळेच वर्तमानपत्र वाचतो. परंतु, सध्या अग्रलेख वाचावा असं फारसं काही नाही असं म्हणत त्यांनी त्यांच्या काळातील काही दाखले दिले. त्यामध्ये दा.भ. कर्णिक, गोविंद तळवळकर, र.ना. लाटे, पा.वा. गाडगीळ ही लोक संपादक असतानाच्या काळात काही घडलं असेल तर वरील मंडळींनी काय लिहलय हे वाचण्याची उत्सुकता असायची. सध्या तस काही वाटत नाही असं निरीक्षण पवारांनी यावेळी नोंदवलं.
ठोकून काढल
दरम्यान, 1990 च्या सुमारास विषय कोणताही असला तरी गोंविदराव तळवळकर तुमच्यावर जोरदार टीका करायचे असं विचालं असता त्याबद्दल काहीच वाटलं नाही. त्यांच्याबद्दल कायम आस्था होती आणि आहे. तसंच, त्यांनी माझं अनेकदा कौतुक केलं तर काहीवेळा जितकं ठोकता येईल तितकं ठोकूनही काढलं. परंतु, गोविंदरावांनी लिहलेलं वाचण्यात एक आनंद होता असंही पवार यावेळी म्हणाले. तसंच, आपल्या वडिलांवर अशी टीका होते याबद्दल काही वाटायचं का? अस विचरलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या माझं बालपण यातचं गेलं. अनेकदा असे प्रसंग यायचे पण आई त्यावर मला सांगायची त्यामुळे फारसं काही वाटलं नाही असं सुळे म्हणाल्या.
पुण्यातील पूर परिस्थितीला प्रशासनच जबाबदार; सुप्रिया सुळेंनी फोडले खापर
जावई कसा हवा
सुप्रिया सुळे यांना अभिमान आहेच की आपण शरद पवारांची मुलगी आहोत मात्र सुप्रिया आपली मुलगी आहे याचा कधी अभिमान वाटणार क्षण आला त्यावार बोलताना पवार म्हणाले, जेव्हा लोकसभेमध्ये रेकग्निशन मिळतं, ते नॅशनल लेव्हलला तेव्हा विशेष कॉन्ट्रिब्युशन असलेल्यांनाच ते मिळतं. काही ठरावीक लोकच यामध्ये असतात. ते जेव्हा सुप्रियाला मिळालं तेव्हा नक्कीच समाधान वाटलं असं पवार म्हणाले. दरम्यान, लग्न कस ठरलं या प्रश्नावर पवार साहेबांपेक्षा माधव आपटे आणि बाळासाहेब ठाकरेंचा रोल जास्त होता असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं. तर, तुम्हाचं काही लग्नाबद्दल ठरलं होत का यावर पवार म्हणाले, जवळचे लोक जो ठरवतील तो जावई असं उत्तर त्यांनी दिलं.