पुण्यातील पूर परिस्थितीला प्रशासनच जबाबदार; सुप्रिया सुळेंनी फोडले खापर

पुण्यातील पूर परिस्थितीला प्रशासनच जबाबदार; सुप्रिया सुळेंनी फोडले खापर

Supriya Sule on Pune Heavy Rain : पुणे शहरात मुसळधार पावसाने अक्षरशः दाणादाण (Pune Heavy Rain) उडाली. शहरातील रस्ते पाण्याखाली गेले. लोकांच्या घरात पाणी शिरले. शहरालाच पाण्याचा विळखा पडला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर शहराची (Pune Rains) दैना उडाली. आता पावसाने उघडीप दिली असून प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र या मुद्द्यावर आता राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही (Supriya Sule) शहरातील परिस्थितीची पाहणी केली. तसेच स्थानिक प्रशासनालाच जबाबदार धरले.

Pune Rain: मुरलीधर मोहोळांचा चौकशीचा सूर; पाणी सोडताना सावध का केल नाही? चौकशी करणार 

प्रशासनाचं हे मोठं अपयश आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी (Muralidhar Mohol) चर्चा केली आहे. ही वेळ राजकारणाची नाही. महापालिका आणि पाटबंधारे विभाग यांचा विस्कळीत कारभार स्पष्टपणे दिसून येत आहे. पावसामुळे लोकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहे. थोडं राजकारण बाजूला ठेवा आणि लक्ष द्या. तातडीने संकटग्रस्त लोकांना विशेष पॅकेज जाहीर करा अशी मागणी खासदार सुळे यांनी केली.

बुधवारी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून पुण्यात मुठा नदी पात्रामध्ये ४० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं होतं. त्यामुळे मुठा नदीला पूर येऊन डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पुलाची वाडी या भागात पाणी शिरलं. अचानक पाणी वाढल्याने नागरिक घरातच अडकून पडले. अनेक घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले. दरम्यान, पुणे शहरासह लगतच्या गावांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या मुसळधार पावसाची दखल घेत प्रशासनाने शाळांना सुट्टी दिलेली आहे.

मोहोळांसमोर नागरिकांचा संताप 

दरम्यान, पुण्यातील पूरस्थिती पाहणी करण्यासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. यावेळी नागरिकांनी त्यांच्यासमोरच आपल्या व्यथा मांडल्या. तसंच प्रशासनाच्या कारभारावर रोष व्यक्त केला. यानंतर माध्यमांशी बोलताना लोकांना झालेला त्रास पाहता त्यांचा रोष सहाजिक आहे. त्यांना त्रास झाला आहे. सूचना न देता मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला असल्याचं मोहोळ यांनी म्हणाले. सध्या सर्व यंत्रणा काम करत आहेत. लवकरात लवकर लोकांना मदत कशी करता येईल, लोकांना सोयी सुविधा पुरवण्याचा काम कसं करता येईल, हे पाहणं सध्या सुरू आहे असंही ते म्हणाले.

पुणे, नाशिकच्या पावसाचा नगरलाही धोका! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube