माजी आमदाराने सोडली अजितदादांची साथ; दुर्रानी आजच करणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Babajani Durrani Joins Sharad Pawar led NCP : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर (Maahrashtra Assembly Elections 2024) फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांत नेत्यांचे इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू झाले आहे. या राजकारणाचे धक्के अजित पवारांना जरा (Ajit Pawar) जास्तच बसत आहे. आताही आणखी एक मोठा धक्का अजितदादांना बसला आहे. अजित पवार गटातील माजी आमदार बाबाजानी दुर्रानी (Babajani Durrani) शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश (Sharad Pawar) करणार आहेत. पक्ष प्रवेशाबाबत त्यांनी घोषणाही केली आहे.
आज सकाळी रामा हॉटेल छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे माझे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत प्रदीर्घ चर्चा झाली. आज दुपारी दोन वाजता पवार साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात माझा प्रवेश होणार आहे, अशी घोषणाच माजी आमदार दुर्रानी यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढली आहे. निवडणुका जवळ येत असताना पक्षाला लागलेली गळती काळजीत टाकणारी ठरत आहे.
Ajit Pawar शब्द देत नाही, पण दिला तर कुणाच्या बापाचं ऐकत नाही; अजितदादांचा मतदारांना शब्द
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्रानींनी अजित पवारांना साथ दिली. निधी मिळण्यासाठी त्यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले होते. मात्र वर्षभरात दुर्रानी अजित पवार गटात फारसे समाधानी नव्हते. तसेच महाविकास आघाडीत जाण्यासाठी मुस्लिम समाजाकडूनही त्यांच्यावर दबाव वाढत चालला होता. अशा परिस्थितीत दुर्रानी यांनी अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, याआधी जयंत पाटील यांनी परभणी दौऱ्यात दुर्रानी यांची त्यांच्या पाथरी गावी जाऊन भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांत बंद दाराआड बराच वेळ चर्चा झाली होती. तेव्हापासूनच दुर्रानी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा खऱ्या असल्याचे आज सिद्ध झाले आहे. आज दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बाबाजानी दुर्रानी पक्ष प्रवेश करणार आहेत.
Sharad Pawar यांच्या सात शिलेदारांची आमदारकी निश्चित; जाणून घ्या कारणं
बाबाजानी दुर्रानी स्वतः आगामी विधानसभा निवडणुकीत पाथरी विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. यासाठीच त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जयंत पाटील यांनी घेतलेली भेट आणि त्यानंतर दुर्रानी यांनी पक्षप्रवेशाचा जाहीर केलेला निर्णय हा याच रणनीतीचा भाग असल्याचे आता सांगितले जात आहे. आज दुपारी माजी आमदार बाबाजानी दुर्राना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.