Sharad Pawar On Uddhav Thackeray And Raj Thackeray : राजकीय वर्तुळात राज ठाकरे (Raj Thackeray) अन् उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर आता शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, त्यांचा हा कौटुंबिक प्रश्न आहे, याची मला माहिती नाही. मी याबाबत त्यांच्याशी बोललो नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कसं बोलणार? अशी तिखट प्रतिक्रिया समोर आली आहे.
मुंबई शहरातील जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह.. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर थेट वार
राजकीय वर्तुळात पवार कुटुंब एकत्र येणार, अशी देखील चर्चा सुरू आहे. यावर शरद पवार म्हणाले की, जनतेच्या कामानिमित्ताने एकत्र आलो होतो. सरकारच्या प्रतिनिधीशी बोलणं यामध्ये काही चुकीचं नाही. तर ठाकरे कुटुंबाची राजकीय समीकरणं बदलणार असल्याची चर्चा सुरू असतानाच (Maharashtra Politics) शरद पवारांनी देखील यावर भाष्य केलंय. हा राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे यांचा कौंटूंबिक प्रश्न आहे. यासंदर्भात कल्पना नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय.
महाराष्ट्रात मराठीच! भाषा वादात तामिळनाडू्च्या मुख्यमंत्र्यांची उडी; म्हणाले, “आता PM मोदींनी..”
एआयवर बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, देशभर राबवले जात ही वस्तुस्थिती नाही. काल सकाळी समूहाचे प्रतापराव पवार यांनी कृषी मंत्री यांना तंत्रज्ञान देशभरामध्ये राबवावं, असं सांगितलं आहे. त्याची सुरुवात आम्ही बारामतीमधून केली आहे. हे तंत्रज्ञान अनेक गोष्टीसाठी उपयोगी आहे. आरोग्य, फायनान्स, इंजीनियरिंग, परंतु जास्त प्रमाणात इंटीयन्स हे कृषी क्षेत्रात आहे. याची आम्ही सुरुवात उसापासून केली आहे.
राज्याच्या वतीने हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अजून पाच पिके घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे, याचा फायदा राज्यामध्ये होईल. पाणीटंचाईवर बोलताना शरद पवार म्हणाले की, काळजी करण्याचे कारण नाही. याअगोदर देखील अशा पद्धतीने पाणीटंचाई झालेली होती. शेतकरी देखील पाण्याचा जपून वापर करतील. मे आणि जून महिना काढायचा आहे, यातून मार्ग काढत आपण बाहेर जाऊ, असं त्यांनी म्हटलंय.